भाजपला मोठा धक्का; संबित पात्रा यांचा पराभव
By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2019 12:26 PM2019-05-24T12:26:26+5:302019-05-24T12:28:34+5:30
पुरी मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले संबित पात्रा यांना बीजेडीच्या पिनाकी मिश्रा यांनी पराभूत केले. पात्रा यांचा ११ हजार ७०० मतांनी निसटता पराभव झाला.
नवी दिल्ली - लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि विरोधकांचा दारुण पराभव झाला. देशात भाजप प्रणीत एनडीएने शानदार कामगिरी करताना ३५० हून अधिक जागा मिळवल्या आहेत. मात्र वृत्तवाहिन्यांवर भाजपची बाजू मांडताना दिसणारे भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांना पराभवाला सामोरे जावे लागले. भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
पुरी मतदार संघातून निवडणुकीच्या रिंगणात असलेले संबित पात्रा यांना बीजेडीच्या पिनाकी मिश्रा यांनी पराभूत केले. पात्रा यांचा ११ हजार ७०० मतांनी निसटता पराभव झाला. २००९ आणि २०१४ मध्ये मिश्रा यांनी याच मतदार संघातून एकतर्फी विजय मिळवला होता. परंतु यावेळी पात्रा यांनी मिश्रा यांना चांगलीच टक्कर दिल्याचे मताधिक्याच्या आकडेवारीवरून दिसून येते.
नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत ८० कोटी लोकांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. निवडणुकीत ५४२ मतदार संघातून ८ हजार उमेदवार आपलं नशीब आजमावत होते. यामध्ये ७२४ महिला होत्या. तर चार तृतीयपंथीयांचा समावेश होता.