व्हिडिओ : 'या' केंद्रीयमंत्र्यांचा सुरेख आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल !

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 13:48 IST2019-05-09T13:13:27+5:302019-05-09T13:48:22+5:30

अनुप्रिया यांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांनी जगजीत सिंह यांची 'होश वालों को खबर क्या' ही गजल आपल्या कार्यकर्त्यांसमोर गायली.

Lok Sabha Election 2019 union minister anupriya patel sing a sang on her birthday video viral | व्हिडिओ : 'या' केंद्रीयमंत्र्यांचा सुरेख आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल !

व्हिडिओ : 'या' केंद्रीयमंत्र्यांचा सुरेख आवाज ऐकून तुम्हीही थक्क व्हाल !

नवी दिल्ली - आरोग्य आणि कुटुंब कल्याण केंद्रीय राज्यमंत्री अनुप्रिया पटेल यांची आवेशपूर्ण भाषणे नेहमीच चर्चेचा विषय ठरली आहेत. अनेकदा अनुप्रिया यांच्या भाषणांची प्रशंसा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. मात्र आता अनुप्रिया पटेल आपल्या भाषणांमुळे नव्हे तर सुरेख आवाजामुळे चर्चेत आल्या आहेत.

अनुप्रिया यांनी गायलेल्या गाण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे. आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधून त्यांनी जगजीत सिंह यांची 'होश वालों को खबर क्या' ही गजल आपल्या कार्यकर्त्यांसमोर गायली. यावेळी कार्यकर्त्यांनी देखील त्यांना दाद दिली.

मिर्झापूर नगरमध्ये चौबटोलामध्ये आपल्या निवडणूक कार्यालयाच्या शुभारंभ प्रसंगी अनुप्रिया पटेल उपस्थित होत्या. आज त्यांचा वाढदिवस आहे, हे उपस्थितांना कळले. त्यानंतर उपस्थितांनी त्यांच्याकडे गाणे गाण्याची फर्माईश केली. त्यानंतर अनुप्रिया यांनी उपस्थितीच्या विनंतीला मान देत माईक घेऊन जगजीत सिंह यांची गजल गायली. अनुप्रिया यांनी गाण्यास सुरूवात करताच अनेकांनी याचा व्हिडिओ केला. तसेच तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला.

Web Title: Lok Sabha Election 2019 union minister anupriya patel sing a sang on her birthday video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.