खासदारकीचा अनोखा विक्रम 'या' नेत्याच्या नावावर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2019 05:09 PM2019-04-19T17:09:42+5:302019-04-19T17:16:35+5:30
पहिल्यांदा पश्चिम बंगाल मधून निवडून आलेले गुप्ता यांनी पुढेही ११ वेळा खासदार होण्याचा इतिहास रचला. इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या आयुष्यात १२ वेळा निवडणुका लढवल्या आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) कडून इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या सर्व निवडणुक लढवल्या होत्या.
मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडले आहे. सर्वच राजकीय पक्ष तगडा उमेदवार देऊन निवडून आणण्यासाठी प्रयत्न करत असतात. मात्र भारतात एक असे व्यक्तिमत्व होते ज्यांनी आजपर्यंत सर्वाधिक वेळा लोकसभा सदस्य होण्याचा मान मिळवला आहे. तरी देखील एकरा वेळा लोकसभेचे सदस्य असलेले कम्युनिस्ट नेते दिवंगत इंद्रजीत गुप्ता अखेरपर्यंत सरकारी निवासस्थानी राहात होते.
पहिल्यांदा पश्चिम बंगाल मधून निवडून आलेले गुप्ता यांनी पुढेही ११ वेळा खासदार होण्याचा इतिहास रचला. इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या आयुष्यात १२ वेळा निवडणुका लढवल्या आहे. भारतीय कम्युनिस्ट पार्टी (सीपीआय) कडून इंद्रजीत गुप्ता यांनी आपल्या सर्व निवडणुक लढवल्या होत्या. आपल्या संपूर्ण आयुष्यात लढवलेल्या निवडणुकीत त्यांना १९७७ मध्ये अलीपूर लोकसभा मतदारसंघातून पहिल्यांदा पराभव स्वीकारावा लागला होता. त्यांतर मात्र त्यांनी लढवलेल्या सर्व निवडणुकीत त्यांचा विजय झाला. देशातील सर्वात जास्त लोकसभा निवडणुक जिंकल्याचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर नोंदवला गेला.
सर्वात जास्त वेळा खासदार कोण राहिले यावरून सुद्धा मतभेद आहे. भारताचे माजी पंतप्रधान अटल-बिहारी वाजपेयी हे १२ वेळा खासदार असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात वाजपेयी हे १० वेळा जनतेतून लोकसभेत गेले आहे तर २ वेळा त्यांना राज्यसभा मधून खासदारकी मिळाली होती. इंद्रजीत गुप्ता हे मात्र ११ ही वेळा जनतेतून निवडणूक लढवत खासदार म्हणून संसदेत निवडून गेले आहेत.
गुप्ता हे एकमेव असे नेते आहेत जे ११ वेळा खासदार म्हणून संसदेत निवडून गेले आहेत. गुप्ता हे वयाचे ३७ वर्ष खासदार राहिले आहेत. माजी पंतप्रधान अटल-बिहारी वाजपेयी,माजी लोकसभा अध्यक्ष सोमीनाथ चटर्जी व माजी केंद्रीय मंत्री पी.एम.सईद यांनी १० वेळा खासदार म्हणून राहिल्याचा मान मिळवला होता.