मुलांना चौकीदार बनवायचे; तर मग खुशाल मोदींना मत द्या : केजरीवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 04:39 PM2019-03-20T16:39:59+5:302019-03-20T16:40:38+5:30
तुमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊन डॉक्टर, इंजिनियर, वकील बनवायचे असेल तर शिकलेल्या आणि इमानदार लोकांचा पक्ष असलेल्या आम आमदी पक्षाला मत द्या, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.
नवी दिल्ली - देशभरात सध्या भारतीय जनता पक्षाकडून 'मै भी चौकीदार' मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेवर विरोधकांकडून जोरदार टीका करण्यात येत आहे. आता आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी देखील मोदींच्या 'मै भी चौकीदार' मोहिमेवर खोचक टीका केली आहे. आपल्या मुलांना चौकीदार बनवायचे असेल तर खुशाल मोदींना मतदान करा, असा टोला केजरीवाल यांनी ट्विट करून लगावला आहे.
मोदी जी पूरे देश को चोकीदार बनाना चाहते हैं।
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 20, 2019
अगर आप भी अपने बच्चों को चोकीदार बनाना चाहते हैं तो मोदी जी को वोट दें।
पर अगर आप अपने बच्चों को अच्छी शिक्षा देकर डाक्टर, इंजीनियर, वक़ील बनाना चाहते हैं तो पढ़े लिखे ईमानदार लोगों की पार्टी आम आदमी पार्टी को वोट दें
पंतप्रधान मोदी देशातील प्रत्येकाला चौकीदार बनवू इच्छित आहेत. तुम्ही देखील तुमच्या मुलांना चौकीदार बनवू इच्छित आहेत तर मग मोदींना मत द्या. परंतु तुम्हाला तुमच्या मुलांना चांगले शिक्षण देऊन डॉक्टर, इंजिनियर, वकील बनवायचे असेल तर शिकलेल्या आणि इमानदार लोकांचा पक्ष असलेल्या आम आमदी पक्षाला मत द्या, असे आवाहन केजरीवाल यांनी केले आहे.
भाजपच्या 'मै भी चौकीदार' या मोहिमेअंतर्गत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपच्या सर्व मंत्र्यांनी आपल्या सोशल मीडियावरील नावाच्या पूर्वी चौकीदार लावले आहे. या मोहिमेची विरोधी पक्षांकडून खिल्ली उडविण्यात आली आहे. राहुल गांधी यांनी टीका करताना म्हटले की, राफेल कराराने चौकीदारची पोलखोल सांगत राहुल यांनी मोदींवर सतत 'चौकीदार चोर' म्हणून निशाना साधला आहे.