... म्हणून भाजपाने आज जाहीर केली पहिली उमेदवार यादी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2019 08:44 PM2019-03-21T20:44:26+5:302019-03-21T20:45:19+5:30
गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसने एका पाठोपाठ एक उमेदवार याद्या प्रसिद्ध केल्या.
नवी दिल्ली: लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांच्या सहा याद्या जाहीर केल्या. मात्र सत्ताधारी भाजपाने एकही यादी जाहीर न केल्याने राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येतं होतं. अखेर भाजपाने आज 182 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी,भाजपा अध्यक्ष अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील दिग्गजांचा समावेश आहे. भाजपाने उमेदवारी जाहीर करताना मुहूर्त साधल्याची जोरदार चर्चा आहे.
गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसने एका पाठोपाठ एक उमेदवार याद्या प्रसिद्ध केल्या. सत्ताधारी भाजपाची यादी जाहीर होणार अशी चर्चा गेल्या आठवड्यात सुरू होती. मात्र होलाष्टक सुरू असल्याने भाजपा उमेदवार यादी जाहीर करणार नाही, अशीही शक्यता वर्तवली जात होती. भाजपाने आज यादी जाहीर केल्याने ही शक्यता खरी ठरली. होळीच्या आधीच्या आठ दिवसांच्या काळाला होलाष्टक म्हटलं जातं. यंदा 14 तारखेपासून होलाष्टक सुरू झालेलं होलाष्टक आज संपलं. यानंतर भाजपाची यादी प्रसिद्ध झाली. होलाष्टकाच्या शुभ कार्य करणं टाळलं जातं. त्यामुळेच भाजपाने गेल्या आठवड्याभरात उमेदवारांची यादी जाहीर केली नसावी, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.
भाजपाच्या 16 लोकसभा उमेदवारांची नावे
महाराष्ट्र प्रदेश
नागपूर – नितीन गडकरी
नंदुरबार – हिना गावित
धुळे – सुभाष भामरे
रावेर – रक्षा खडसे
अकोला – संजय धोत्रे
वर्धा – रामदास तडस
चिमूर-गडचिरोली – अशोक नेते
जालना – रावसाहेब दानवे
भिवंडी – कपिल पाटील
मुंबई नॉर्थ – गोपाळ शेट्टी
मुंबई नॉर्थ सेंट्रल – पूनम महाजन
नगर – सुजय विखे
बीड – डॉ. प्रीतम मुंडे
लातूर – सुधाकरराव श्रृंगारे
सांगली – संजयकाका पाटील
चंद्रपूर - हंसराज अहिर