भाजप उमेदवाराला ईव्हीएम फोडल्याच्या आरोपावरून अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2019 14:28 IST2019-04-20T14:27:27+5:302019-04-20T14:28:06+5:30
नीलमणि बिसोई यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदान केंद्रांवर प्रवेश करताच ईव्हीएम मशीन फोडली. यावेळी मतदान केंद्रांवर असलेल्या अधिकारी व पोलिसांनी त्यांना थांबवण्याच्या प्रयत्न केला. बिसोई यांनी पोलिसांच्या विरोधाला झुगारता मशिनचे फोडून तुकडे केले.

भाजप उमेदवाराला ईव्हीएम फोडल्याच्या आरोपावरून अटक
मुंबई - ओडिशामधील भाजपच्या एका उमेदवाराला ईव्हीएम मशीन फोडल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आली आहे. ओडिशामधील गंजाम जिल्ह्यातील ही घटना आहे. दुसऱ्या टप्यातील सोरदा विधानसभा जगासाठी भाजपचे नीलमणि बिसोई यांना उमेदवारी देण्यात आली होती. मतदानाच्या दिवशी त्यांनी मतदारसंघातील एका मतदान केंद्रावर जाऊन ईव्हीएम फोडल्याचा आरोपा त्यांच्यावर करण्यात आला असून त्यांना अटक ही करण्यात आली आहे.
ओडिशामधील लोकसभा आणि विधनासभा निवडणुकासोबत होत आहे. गंजाम जिल्ह्यातील सोरदा विधानसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार नीलमणि बिसोई मतदानाच्या दिवशी रेनती गावातील मतदानकेंद्रावर कार्यकर्त्या सहित गेले होते. मतदानाची वेळ संपण्याच्या एक तास आधी बिसोई गेल्याने मतदान केंद्रांवर एकूण ५३९ मतदान पैकी ४१४ मतदान झाले होते.
नीलमणि बिसोई यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन मतदान केंद्रांवर प्रवेश करताच ईव्हीएम मशीन फोडली. यावेळी मतदान केंद्रांवर असलेल्या अधिकारी व पोलिसांनी त्यांना थांबवण्याच्या प्रयत्न केला. बिसोई यांनी पोलिसांच्या विरोधाला झुगारता मशिनचे फोडून तुकडे केले. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
भाजप उमदेवार नीलमणि बिसोई यांच्या ईव्हीएम फोडल्याच्या कारनाम्यामुळे जिल्हाधिकारांच्या आदेशाने केंद्रप्रमुखांनी दिलेल्या तक्रारीवरून सोरदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले असून बिसोई यांना अटक सुद्धा करण्यात आली आहे.