१८% ‘कलंकित’; २९% कोट्यधीश; तिसऱ्या टप्प्यातील १,३५२ उमेदवारांकडे आहे ५.७७ कोटींची सरासरी संपत्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2024 08:39 AM2024-04-30T08:39:11+5:302024-04-30T08:39:58+5:30
येत्या ७ मे रोजी मतदान होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी १२ राज्यांतील ९५ जागांसाठी १३५२ उमेदवार रिंगणात आहेत.
नवी दिल्ली : येत्या ७ मे रोजी मतदान होणाऱ्या तिसऱ्या टप्प्यातील लोकसभा निवडणुकीसाठी १२ राज्यांतील ९५ जागांसाठी १३५२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यापैकी २४४ (१८ %) उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत, तर ३९२ (२९ %) उमेदवार कोट्यधीश असल्याचे असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्सच्या (एडीआर) अहवालातून पुढे आले आहे.
सर्वांत श्रीमंत उमेदवार कुठे ?
राज्य एकूण कोट्यधीश
गुजरात २६६ ६८
महाराष्ट्र २५८ ७१
कर्नाटक २२७ ६९
छत्तीसगड १६८ ३७
मध्य प्रदेश १२७ ३७
सर्वाधिक संपत्ती असलेले उमेदवार
उमेदवार मतदारसंघ (राज्य) पक्ष चल संपत्ती अचल संपत्ती एकूण संपत्ती
पल्लवी श्रीनिवास डेंपे दक्षिण गोवा (गोवा) भाजप १,२५० कोटी १११ कोटी १३६१.६८ कोटी
ज्योतिरादित्य सिधिंया गुणा (मध्य प्रदेश) भाजप ६२.५७ कोटी ३६२.१७ कोटी ४२४.७४ कोटी
छत्रपती शाहू महाराज कोल्हापूर (महाराष्ट्र) काॅंग्रेस १६५.७७ कोटी १७७.०९ कोटी ३४२.८६ कोटी
सर्वांत कमी संपत्ती असलेले उमेदवार
उमेदवार मतदारसंघ (राज्य) पक्ष चल संपत्ती अचल संपत्ती एकूण संपत्ती
इरफान अबुतालिब चंद कोल्हापूर (महाराष्ट्र) अपक्ष १०० रुपये ० १०० रुपये
रेखाबेन चौधरी बार्डोली (गुजरात) बसपा २,००० रुपये ० २,००० रुपये
मनोहर प्रदीप सातपुते हातकणंगले (महाराष्ट्र) अपक्ष २,००० रुपये ० २,००० रुपये
उमेदवारांची शैक्षणिक पार्श्वभूमी काय?
अशिक्षित १९
शिक्षित ५६
५ वी पास ७१
८ वी पास १३१
१० वी पास २०६
१२ वी पास २३१
डिप्लोमा ४४
पदवीधर २१९
व्या. पदवीधर १४३
पदव्युत्तर पदवी २०८
पीएच. डी. २१
डिप्लोमा ४४