उद्धव ठाकरेंविरुद्धच्या तक्रारीवर कार्यवाही करा, केंद्रीय निवडणूक आयाेगाचे निर्देश
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 06:00 AM2024-06-04T06:00:51+5:302024-06-04T06:01:20+5:30
Lok Sabha Election 2024 :मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रारीवर आवश्यक कार्यवाही करुन अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत.
नवी दिल्ली : महाराष्ट्रातील लाेकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात २० मे रोजी मतदान सुरु असताना पत्रकार परिषद घेतल्याप्रकरणी उद्धवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीवर कार्यवाही करा, असे निर्देश सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र निवडणूक अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबई प्रदेश भाजपचे अध्यक्ष आशीष शेलार यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन आयोगाने राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना तक्रारीवर आवश्यक कार्यवाही करुन अहवाल पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. मुंबईत २० मे रोजी उद्धवसेना किंवा मविआचे संभाव्य मतदार असलेल्या भागांमध्ये आयोगाकडून मुद्दाम संथगतीने मतदान झाल्याने अनेक मतदार कंटाळून परत गेल्याचा तसेच अनेक मतदारांची नावे यादीतून वगळण्यात आल्याचा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला होता.