Lok Sabha Election Result 2024 : 'या' राज्यात तब्बल 26 वर्षांनंतर भाजप 'शून्या'वर! काँग्रेसला चांगलं यश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 09:22 PM2024-06-04T21:22:08+5:302024-06-04T21:23:26+5:30

या राज्यात भाजपचे खातेही उघडू शकले नाही. तर काँग्रेसला ७ आणि आम आदमी पक्षाला 3 जागा मिळाल्या आहेत...

lok sabha election 2024 After 26 years in this state, BJP is on zero! Good luck to Congress | Lok Sabha Election Result 2024 : 'या' राज्यात तब्बल 26 वर्षांनंतर भाजप 'शून्या'वर! काँग्रेसला चांगलं यश

Lok Sabha Election Result 2024 : 'या' राज्यात तब्बल 26 वर्षांनंतर भाजप 'शून्या'वर! काँग्रेसला चांगलं यश

Lok Sabha Election Result 2024 : देशभरातील लोकसभेच्या ५४२ जागांचे निकाल आता साधारणपणे स्पष्ट झाले आहेत. या निवडणुकीत भाजपची कामगीर अपेक्षे प्रमाणे झाली नाही. तर काँग्रेसच्या कामगिरीत चांगली सुधारणा झाल्याचे दिसत आहे. या निवडणुकीत भाजपचा २३९ जागांवर, तर काँग्रेसचा 99 जागांवर विजय होताना दिसत आहे. भाजपला उत्तर प्रदेश आणि राजस्थानात मोठा झटका बसला आहे. या दोन्ही राज्यांत 2014 आणि 2019 मध्ये भापला मोठे यश मिळाले होते. याचबरोबर, भाजपला पंजाबमध्येही मोठा झटका बसला आहे. येथे तर भाजपचे खातेही उघडू शकले नाही. तर काँग्रेसला ७, आम आदमी पक्षाला 3, अपक्षांना दोन तर अकाली दलाला एका जागेवर विजय मिळाला आहे. पंजाबमध्ये लोकसभेच्या एकूण १३ जागा आहेत.

महत्वाचे म्हणजे, पंजाबमधील अधिकांश जागांवर भाजप तिसऱ्या अथवा चौथ्या क्रमांकावर आहे. हा देखील भाजपसाठीला मोठा धक्का आहे. महत्वाचे म्हणजे, 1998 नंतर पहिल्यांदाच भाजपला पंजाबमध्ये एकही जागा जिंकता आलेली नाही. भाजप 1998 पासूनच पंजाबमध्ये एक ना एका जागेवर विजय मिळवतच आहे.
  
1998 मध्ये भाजपला 3 जागा मिळाल्या होत्य आणि त्यानंतर 1999 च्या निवडणुकीत एकच जागा मिळाली होती. यानंतर, 2004 मध्ये पुन्हा 3 जागा मिळाल्या होत्या, 2009 मध्ये पुन्हा 1 जागा मिळाली. यानंतर पुन्हा 2014 आणि 2019 मध्ये प्रत्येकी १ आणि २ जागा मिळाल्या होत्या.
 

Web Title: lok sabha election 2024 After 26 years in this state, BJP is on zero! Good luck to Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.