उमेदवारी घाेषित केल्याने आघाडीचा ‘धर्म’च अडचणीत! काँग्रेससह पप्पू यादवांना माेठा झटका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 09:09 AM2024-03-28T09:09:16+5:302024-03-28T09:09:41+5:30
Lok Sabha Election 2024 : महाआघाडीत लालू यांनी काँग्रेसला आठ जागा देऊ केल्या आहेत.
- राजेश शेगाेकार
पाटणा : राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि डावे पक्ष यांच्या महागठबंधनमधील जागावाटप हाेण्यापूर्वीच राजदचे सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांनी डझनभर उमेदवारांची घाेषणा केली. त्यापाठाेपाठ आता ‘सीपीआयएम’ने खगरिया लोकसभा मतदारसंघातून उमेदवाराची घाेषणा करून महागठबंधनच्या अडचणीत वाढ केली आहे.
काँग्रेसला हव्या असणाऱ्या जागांमधील पूर्णिया व कटिहार या दाेन जागांवर सन्मानजनक ताेडगा निघेल अशी अपेक्षा हाेती. त्यासाठी गेल्या दाेन दिवसांपासून चर्चेचे गुऱ्हाळही सुरू हाेते; मात्र बुधवारी संध्याकाळी लालूप्रसाद यादव यांनी पूर्णिया मतदारसंघातून बीमा भारती यांना उमेदवारी जाहीर करून काँग्रेससह पप्पू यादवांना माेठा झटका दिला आहे.
महाआघाडीत लालू यांनी काँग्रेसला आठ जागा देऊ केल्या आहेत. त्यामध्ये काँग्रेसला कटिहार आणि पूर्णिया या दाेन जागाही हव्या आहेत. पप्पू यादव यांनी गेल्याच आठवड्यात आपली पार्टी जापचे काँग्रेसमध्ये विलीनीकरण केले हाेते. त्यामुळे त्यांना सेफ करण्यासाठी काँग्रेसने पूर्णियाची जागा प्रतिष्ठेची केली हाेती. लालूंनी उमेदवारी घाेषित करून महागठबंधनचा ‘धर्म’च अडचणीत आणला आहे. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला आहे.
जावयाला पसंती
जमुई लोकसभा मतदारसंघात ‘एनडीए’चा तरुण चेहरा चिराग पासवान यांनी सलग दाेन वेळा विजय मिळविला हाेता. त्यामुळे तेच या मतदारसंघात हॅटट्रिकसाठी उतरतील अशी चर्चा असतानाच पासवान यांनी जमुई या मतदारसंघात त्यांचे जावई अरुण भारती यांना उमेदवारी देऊन करून सर्वांनाच धक्का दिला आहे
राजकारण तापले
२०१९ मध्ये कीर्ती आझाद यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर त्यांना दरभंगातून उमेदवारीचा शब्द दिला हाेता. प्रत्यक्षात जागावाटपामध्ये त्यांना जागा मिळाली नाही व झारखंडमध्ये जावे लागले. तशीच स्थिती पप्पू यादवांची झाली.