"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2024 04:10 PM2024-05-17T16:10:23+5:302024-05-17T16:20:20+5:30
Akhilesh Yadav And Smriti Irani : अखिलेश यादव यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांच्या बाजूने प्रचार केला. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी अमेठी लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार किशोरी लाल शर्मा यांच्या बाजूने प्रचार केला. यावेळी त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करत आहेत. ज्याने 13 रुपये किलोने साखर दिली नाही त्यांना अमेठीचे लोक मतदान करणार नाहीत.
"सर्वप्रथम मी नंदबाबांच्या पवित्र स्थळाला नमन करतो. नंदबाबांचे आशीर्वाद आम्हाला नेहमीच मिळत आले आहेत. नंदबाबा आणि तुमच्या आशीर्वादाने काँग्रेस पक्षाचे उमेदवार प्रचंड बहुमताने विजयी होतील, असा मला पूर्ण विश्वास आहे. आमची फसवणूक करणारा आणखी एक व्यक्ती आहे… त्याने धोका दिल्यानंतर त्याच्याकडे नवीन कार आली आहे… फसवणूक करणारे लोक रात्रीच्या अंधारात कारमध्ये बसून फ्लॅट पाहण्यासाठी गेले होते" असं अखिलेश यादव यांनी म्हटलं आहे.
"400 जागा काढून टाका आणि 140 जागा शिल्लक ठेवा. जनतेने ठरवले आहे की भाजपाच्या लोकांना 140 जागाच द्यायच्या. या लोकांना संविधान बदलायचं आहे. त्यांना आमचे आणि तुमचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत. संविधान बदलायला निघालेल्यांना तुम्ही बदलणार की नाही? तुम्ही घाबरणार तर नाही ना? बूथपर्यंत पोहोचाल ना?" असा सवालही अखिलेश यादव यांनी विचारला आहे.