दोन राज्यांचे मिळतात लाभ, आता प्रश्न मतदान कुठे करावे?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 09:35 AM2024-05-04T09:35:25+5:302024-05-04T09:36:38+5:30
आंध्र प्रदेश आणि ओडिशाच्या सीमेलगत असलेल्या गावातील नागरिकांसमाेर निर्माण झाला पेच
काेटिया : राज्यांच्या सीमेलगत असलेल्या गावांमध्ये बऱ्याच समस्या दिसून येतात. प्रामुख्याने पिण्याचे पाणी, वीज यासारख्या मूलभूत समस्यांचा त्यात समावेश असताे. या गावांतील नागरिकांना दाेन्ही राज्यांमध्ये मतदान करण्याचा विशेषाधिकार असतो. मात्र, त्यामुळेही अनेक प्रश्न निर्माण हाेतात. आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांच्या सीमेला लागून असलेल्या काेटिया या गावाचीही अशीच स्थिती आहे. प्रादेशिक अधिकाराचा खटला सर्वाेच्च न्यायालयात सुरू आहे. मात्र, ग्रामस्थांना दाेन्ही राज्यांचे मतदार ओळखपत्र प्राप्त झाले आहेत. २,७०० मतदार काेटिया गावातील २१ पाड्यांमध्ये येतात.
यावेळी प्रश्न जरा वेगळाच!
ग्रामस्थांपुढे सध्या प्रश्न असा आहे, की मतदान एकाच दिवशी आहे. मतदार एकाच ठिकाणी मतदान करु शकतो. यापूर्वी तारखा वेगवेगळ्या असल्यामुळे त्यांनी दोन्ही राज्यांमध्ये मतदान केले होते.
ग्रामस्थांना मिळतो दुहेरी लाभ
डाेलभद्र पाड्यात ओडिशा सरकारने घर दिले. आंध्र सरकारने दिली वीज.
पाड्यामध्ये दाेन शाळा आहे. एका शाळेत ओडिया आणि दुसऱ्या शाळेत तेलुगू माध्यमात शिक्षण दिले जाते.
दाेन्ही राज्यांनी दाेन पाण्याच्या टाक्या बांधल्या आहेत.
दाेन्ही सरकारकडून माेफत तांदूळ मिळताे.
निराधार पेन्शन याेजनेतून आंध्र सरकार ३ हजार रुपये, तर ओडिशा सरकार १ हजार रुपये देते.