अमेठीत स्मृती इराणी यांना मोठा धक्का; काँग्रेसच्या किशोरीलाल शर्मांची विजयी आघाडी
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 04:23 PM2024-06-04T16:23:32+5:302024-06-04T16:24:15+5:30
काँग्रेसचे किशोरीलाल शर्मा 1.26 लाख मतांनी आघाडीवर, प्रियंका गांधींनी केले अभिनंदन.
Lok Sabha Election 2024 : उत्तर प्रदेशातील काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी लोकसभा मतदारसंघात मोठी उलथापालथ झाली आहे. गेल्या निवडणुकीत राहुल गांधी यांचा पराभव करुन विजयी झालेल्या स्मृती इराणी यांना मोठा धक्का बसला आहे. गांधी घराण्याचे निकटवर्तीय काँग्रेस उमेदवार किशोरीलाल शर्मा मोठ्या विजयाकडे वाटचाल करत आहेत.
किशोरी भैया, मुझे कभी कोई शक नहीं था, मुझे शुरू से यक़ीन था कि आप जीतोगे। आपको और अमेठी के मेरे प्यारे भाइयों और बहनों को हार्दिक बधाई ! pic.twitter.com/JzH5Gr3z30
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) June 4, 2024
प्रियंका गांधींनी केले अभिनंदन
आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत काँग्रेसच्या किशोरीलाल 1,26000 हून अधिक मतांनी आघाडीवर असल्याचे दिसत आहे. म्हणजेच, आता भाजपच्या स्मृती इराणी यांचे कमबॅक अवघड आहे. दरम्यान, या निकालानंतर प्रियांका गांधी यांनी किशोरी लाल यांचे अभिनंदन केले आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की, "किशोरी भैया, मला कधीच शंका नव्हती, मला सुरुवातीपासून खात्री होती तु्म्ही जिंकाल. तुमचे आणि अमेठीच्या माझ्या प्रिय बंधू-भगिनींचे हार्दिक अभिनंदन!"
कोण आहेत किशोरीलाल शर्मा?
अमेठी हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला होता, पण 2019 ला झालेल्या निवडणुकीत स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा पराभव केला होता. पण, यंदा काँग्रेसने किशोरीलाल शर्मा यांच्यावर अमेठीची जबाबदारी टाकली. येथे 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात मतदान झाले होते. आता शर्मा यांनी अमेठी काबीज करुन पुन्हा एकदा तिथे काँग्रेसचा झेंडा फडकावला आहे.