भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: May 15, 2024 10:58 AM2024-05-15T10:58:59+5:302024-05-15T11:06:17+5:30

Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा दिल्लीत प्रचारासाठी आले आहेत.

lok sabha election 2024 chief minister himanta biswa sarma says bjp 400 seat target can build mathura varanasi temple | भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान

भाजपला ४०० जागा मिळाल्या तर काय होईल? सीएम हिमंता बिस्वा सरमांचं मोठं विधान

Lok Sabha Election 2024 ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकांची जोरदार रणधुमाळी सुरू आहे. पाचव्या टप्प्यातील मतदानासाठी प्रचारसभा सुरू आहेत. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा दिल्लीत प्रचारासाठी आले आहेत. यावेळी त्यांनी सभेत मोठं विधान केलं आहे. "भाजपला ४०० जागा मिळाल्यास वाराणसीमध्ये ज्ञानवापी आणि कृष्णजन्मभूमी मंदिरे बांधली जातील, असं विधान मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा  यांनी केलं आहे. यावेळी ४०० ओलांडली म्हणजे ज्ञानवापी येथील शिवालय, मथुरा येथील श्री कृष्ण मंदिर आणि पाकव्याप्त काश्मीर भारतात परत येईल, असंही ते म्हणाले. 

भाजप उमेदवार हर्ष मल्होत्रा ​​यांच्या प्रचारासाठी हिमंता बिस्वा सरमा दिल्लीत आले होते. येथील लक्ष्मीनगर येथील निवडणूक सभेला संबोधित करताना त्यांनी भाजप सरकार आरक्षणाला अधिक बळ देण्याचे काम करत असल्याचा दावाही केला.

Giriraj Singh : "काँग्रेसला देशात इस्लामिक स्टेट बनवायचाय; राहुल-सोनिया गांधी देश सोडून पळून जाणार"

'गेल्या निवडणुकीत आम्ही सांगितले होते की राम मंदिर बनवायचे आहे आणि यावेळी निवडणुकीत आम्ही तुमच्यामध्ये आलो तेव्हा राम मंदिर बांधले आहे. त्यामुळे आता विजयही मोठा झाला पाहिजे, कारण आम्ही दिलेली आश्वासने पूर्ण केली आहेत, असंही मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा म्हणाले. 

ज्यावेळी काँग्रेस आम्हाला ४०० पेक्षा जास्त जागा कशासाठी हवेत असं विचारते, तेव्हा आम्हाला वाटले की त्याचे उत्तर असायला हवे. तेव्हा मी म्हणतो, आमच्याकडे ३०० जागा होत्या तेव्हा आम्ही राम मंदिर बांधले. जर आपल्याला ४०० जग मिळाल्या तर मथुरामध्ये श्री कृष्णाचे जन्मस्थान असेल. आणि ज्ञानवापी मशि‍दीच्या जागी बाबा विश्वनाथ यांचे भव्य मंदिर बांधण्यात येणार आहे, असंही सरमा म्हणाले. 

देशाची राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या ७ जागांसाठी २५ मे रोजी मतदान होणार आहे. मतदानापूर्वी भाजपने आपली सर्व ताकद दिल्लीत लावली आहे. भाजपचे बडे नेते दिल्लीत आहेत.

Web Title: lok sabha election 2024 chief minister himanta biswa sarma says bjp 400 seat target can build mathura varanasi temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.