घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने, काय होणार?
By योगेश पांडे | Published: May 24, 2024 12:57 PM2024-05-24T12:57:02+5:302024-05-24T12:58:36+5:30
भाजपने या मतदारसंघातून विद्यमान खासदार सौमित्र खान यांनाच उमेदवारी दिली आहे. तर तृणमूल काँग्रेसने त्यांच्या पत्नी सुजाता मंडल यांच्यावर विश्वास टाकला आहे. दोघांनीही २०१० मध्ये प्रेमविवाह केला होता त्यावेळी खान काँग्रेसमध्ये होते.
बिष्णूपूर (पश्चिम बंगाल) : एकाच कुटुंबातील व्यक्ती निवडणुकीच्या रिंगणात एकमेकांविरोधात उभे ठाकणे ही काही नवीन बाब नाही. मात्र पश्चिम बंगालमधील बिष्णूपूर या मतदारसंघात अगोदर प्रेमविवाह केलेले व नंतर राजकीय विचारांमुळे वेगळे झालेले घटस्फोटित पती-पत्नीच आमनेसामने उभे झाले आहेत. विद्यमान खासदार पती भाजप तर पत्नी तृणमूलकडून लढत असून राजकीय रिंगणात फॅमिली ड्रामाच सुरू असल्याचा अनुभव मतदारांना येत आहे.
भाजपने या मतदारसंघातून विद्यमान खासदार सौमित्र खान यांनाच उमेदवारी दिली आहे. तर तृणमूल काँग्रेसने त्यांच्या पत्नी सुजाता मंडल यांच्यावर विश्वास टाकला आहे. दोघांनीही २०१० मध्ये प्रेमविवाह केला होता त्यावेळी खान काँग्रेसमध्ये होते.
मतदारसंघातील कळीचे मुद्दे
- अनेक ठिकाणी पिण्याच्या पाण्याची समस्या
- ग्रामीण व शहरी भागात रस्त्यांची कमतरता
- पर्यटनासाठी उपयुक्त जागा असूनदेखील राजकीय अनास्थेमुळे बेरोजगारी वाढीस.
- सुजाता या स्थानिक उमेदवार व विकास योजना या मुद्द्यांवर प्रचार करत आहेत. तर अगोदर तृणमूल व नंतर भाजपकडून या जागेवर विजयी झालेले सौमित्र हे भ्रष्टाचारावर बोट ठेवून प्रचार करत असून त्यांचे हॅटट्रिकसाठी प्रयत्न सुरू आहेत.
२०१९ मध्ये काय घडले?
सौमित्र खान, भाजप (विजयी) - ६,५७,०१९
श्यामल संत्रा, तृणमूल काँग्रेस - ५,७८,९७२