पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 06:42 AM2024-05-02T06:42:15+5:302024-05-02T06:43:14+5:30
लोकसभेच्या पहिल्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून मंगळवारी जाहीर करण्यात आली.
नवी दिल्ली : लोकसभेच्या पहिल्या दोन टप्प्यात झालेल्या मतदानाची अंतिम आकडेवारी निवडणूक आयोगाकडून मंगळवारी जाहीर करण्यात आली. त्यानुसार निवडणूक आयोगाने मतदानाच्या दिवशी सायंकाळी ७ पर्यंत जाहीर केलेली मतदानाची प्राथमिक आकडेवारी आणि मंगळवारी जाहीर झालेली अंतिम आकडेवारी यामध्ये सरासरी ३ टक्क्यांची वाढ झाल्याचे दिसत आहे. राज्यात सर्वाधिक वाढ ही चंद्रपूरमध्ये झाल्याचे दिसते.
पहिला टप्पा फरक ३.२७ टक्क्यांचा
राज्य (जागा) मतदानाच्या ३० एप्रिल +/-
दिवशी (%)* अंतिम आकडे
अंदमान-निकोबार (१) ५६.८७ ६४.१० ७.२३
अरुणाचल प्रदेश (२) ६५.४६ ७७.६८ १२.२२
आसाम (५) ७१.३८ ७८.२५ ६.८७
बिहार (४) ४७.४९ ४९.२६ १.७७
छत्तीसगड (१) ६३.४१ ६८.२९ ४.८८
जम्मू-काश्मीर (१) ६५.०८ ६८.२७ ३.१९
लक्षद्वीप (१) ५९.०२ ८४.१६ २५.१४
मध्य प्रदेश (६) ६३.३३ ६७.७५ ४.४२
महाराष्ट्र (५) ५५.२९ ६३.७१ ८.४२
मणिपूर (२) ६८.६२ ७६.१० ७.४८
मेघालय (२) ७०.२६ ७६.६० ६.३४
मिझोरम (१) ५४.१८ ५६.८७ २.६९
नागालँड (१) ५६.७७ ५७.७२ ०.९५
पुद्दुचेरी (१) ७३.२५ ७८.९० ५.६५
राजस्थान (१२) ५०.९५ ५७.६५ ६.७०
सिक्कीम (१) ६८.०६ ७९.८८ ११.८२
तामिळनाडू (३९) ६२.१९ ६९.७२ ७.५३
त्रिपुरा (१) ७९.९० ८१.४८ १.५८
उत्तर प्रदेश (८) ५७.६१ ६१.११ ३.५०
उत्तराखंड (५) ५३.६४ ५७.२२ ३.५८
पश्चिम बंगाल (३) ७७.५७ ८१.९१ ४.३४
२१ राज्ये (१०२) ६२.८७ ६६.१४ ३.२७
दुसरा टप्पा फरक ३.२१ टक्के
राज्य (जागा) मतदानाच्या ३० एप्रिल +/-
दिवशी (%)* अंतिम आकडे
आसाम (५) ७७.३५ ८१.१७ ३.८२
बिहार (५) ५७.८१ ५९.४५ १.६४
छत्तीसगड (३) ७५.१५ ७६.२४ १.०९
जम्मू-काश्मीर (१) ७२.३२ ७२.२२ -०.१
कर्नाटक (१४) ६८.४४ ६९.५६ १.१२
केरळ (२०) ६९.७७ ७१.२७ १.५०
मध्य प्रदेश (७) ५८.२६ ५८.५९ ०.३३
महाराष्ट्र (८) ५९.६३ ६२.७१ ३.०८
मणिपूर (१) ७८.७८ ८४.८५ ६.०७
राजस्थान (१३) ६४.०७ ६५.०३ ०.९६
त्रिपुरा (१) ७९.६६ ८०.३६ ०.७०
उत्तर प्रदेश (८) ५४.८५ ५५.१९ ०.३४
पश्चिम बंगाल (३) ७२.७५ ७६.५८ ३.८३
एकूण (८८) ६३.५० ६६.७१ ३.२१
महाराष्ट्रात पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात मिळून एकूण १३ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. त्यावेळी सायंकाळी ७ पर्यंतच्या आकडेवारीनुसार सरासरी ५९.५६ टक्के मतदान झाले होते. अंतिम आकडेवारी आली तेव्हा ती ६२.७१ टक्के झाली आहे.
मतदार संघ मतदानाच्या ३० एप्रिल +/-
दिवशी (%)* अंतिम आकडे
भंडारा-गोंदिया ६४.०८ ६७.०४ २.९६
चंद्रपूर ६०.३५ ६७.५५ ७.२०
गडचिरोली-चिमूर ६९.४३ ७१.८८ २.४५
नागपूर ५४.४६ ५४.३२ -०.१४
रामटेक ५९.५८ ६१.०१ १.४३
वर्धा ६२.६५ ६४.८५ २.२०
अकोला ५८.०९ ६१.७९ ३.७०
अमरावती ६०.७४ ६३.६७ २.९३
बुलढाणा ५८.४५ ६२.०३ ३.५८
हिंगोली ६०.७९ ६३.५४ २.७५
नांदेड ५९.५७ ६०.९४ १.३७
परभणी ६०.०९ ६२.२६ २.१७
यवतमाळ- वाशीम ५७.०० ६२.८७ ५.८७
एकूण (१३) ५९.६३ ६२.७१ ३.०८