ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
By वसंत भोसले | Published: April 28, 2024 09:28 AM2024-04-28T09:28:36+5:302024-04-28T09:29:27+5:30
शिवमोग्गा येथे भाजपने सलग चार निवडणूका जिंकल्या आहेत. भाजपने बी. एस. येड्डीयुरप्पा यांचे चिरंजीव बी. एस. राघवेंद्र यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे.
डॉ. वसंत भोसले
शिवमोग्गा (कर्नाटक) : दोघा माजी मुख्यमंत्र्यांच्या मुलांची शिवमोग्गा लोकसभा मतदारसंघात लढत होत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री के. ईश्वराप्पा यांनी बंड केल्यामुळे रंगत वाढली आहे. त्यांची पक्षातून सहा वर्षासाठी यासाठी हकालपट्टी केली आहे.
शिवमोग्गा येथे भाजपने सलग चार निवडणूका जिंकल्या आहेत. भाजपने बी. एस. येड्डीयुरप्पा यांचे चिरंजीव बी. एस. राघवेंद्र यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने माजी मुख्यमंत्री एस. बंगारप्पा यांच्या कन्या गीता शिवराजकुमार यांना उमेदवारी दिली आहे. ईश्वराप्पा यांचे चिरंजीव श्रीकांता यांना हावेरी येथून उमेदवारी हवी होती. पक्षाने ती नाकारल्याने ईश्वरप्पा यांनी बंड केले आहे. भाजपने हावेरीतून माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना उमेदवारी दिली आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
माजी मुख्यमंत्री येडियुराप्पा व
कुटुंबियांचा मतदारसंघावर प्रभाव
ईश्वराप्पा यांना ओबीसींची
सहानुभूती मिळण्याची शक्यता
अभिनेता डॉ. शिवराजकुमार यांची
लोकप्रियता
हिंदु-मुस्लिम वादाचा नेहमीच प्रभाव
एकूण मतदार
८,४४,२४२ पुरुष
१७,०८,२६४
८,६४,०३२ महिला
२०१९ मध्ये काय घडले?
बी. वाय. राघवेंद्र भाजप (विजयी) ७,२९,८७२
मधु बंगारप्पा जनता दल (पराभूत) ५,०६,५१२