मिशन 2024 : भाजपसाठी आनंदाची बातमी! या राज्यात NDA ला मिळाला नवा 'साथी'; युती होताच जागा वाटपही 'डन'
By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2024 01:21 PM2024-03-19T13:21:00+5:302024-03-19T13:21:42+5:30
Lok Sabha Election 2024: पट्टाली मक्कल काचीची स्थापना 1989 मध्ये डॉ एस. रामदास यांनी केली होती. अंबुमणी रामदास सध्या राज्यसभा सदस्य आहेत. ते 2019 मध्ये बिनविरोध निवडून आले होते.
लोकसभा निवडणूक 2024 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. विविध राज्यांमध्ये भाजपचे आपल्या मित्रपक्षांसोबत जागावाट सुरू आहे. यातच आता, भाजपने तामिळनाडूतील जागावाटपालाही अंतिम रूप दिले आहे. येथे पट्टाली मक्कल कच्ची (PMK) लोकसभेच्या 39 पैकी 10 जागा लढवणार आहे.
तामिळनाडूतील जागावाटप फायनल -
पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, भाजपाने 19 एप्रिलला तामिळनाडूमध्ये होणाऱ्या होणाऱ्या लोकसभा निवडणुकीसाठी अंबुमणी रामदास यांच्या नेतृत्वाखालील पट्टाली मक्कल काची (पीएमके)सोबत युती केली आहे. भाजप आणि पट्टाली मक्कल काची यांच्यात जागावाटपही झाले आहे. याअंतर्गत भाजपने आपला सहकारी पक्ष पीएमकेला 10 दागा दिल्या आहेत. भाजपचे तामिळनाडू अध्यक्ष के. अन्नामलाई आणि पीएमके अध्यक्ष रामदास यांच्यात यासंदर्भात चर्चा झाली.
पट्टाली मक्कल काचीची स्थापना 1989 मध्ये डॉ एस. रामदास यांनी केली होती. अंबुमणी रामदास सध्या राज्यसभा सदस्य आहेत. ते 2019 मध्ये बिनविरोध निवडून आले होते. अंबुमणी रामदास हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या सरकारमध्ये आरोग्यमंत्री होते. ते धर्मपुरी लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणूनही निवडून आले होते.
पट्टाली मक्कल काची बद्दल थोडक्यात -
खरे तर, तामिळनाडूमध्ये भाजपकडे एखादा मोठा सहकारी पक्ष नाही. अशा परिस्थिती भाजपने तामिळनाडूमध्ये पीएमके सोबत युती केली आहे. पट्टाली मक्कल काची (पीएमके) हा एक वन्नियार समाजाचे प्रभुत्व असलेला पक्ष आहे आणि राज्यातील काही उत्तरेकडील जिल्ह्यात या पक्षाचा प्रभाव आहे. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पीएमकेने सात जागांवर निवडणूक लढली होती. मात्र त्यांना फारसे मोठे यश मिळाले नाही. मात्र त्यांच्या मतांची टक्केवारी 5.42 एवढी होती. पीएमकेने 2021 मध्ये तामिळनाडू विधानसभा निवडणूक AIADMK सोबत आघाडी करून लढवली होती. यात त्यांनी पाच जागा जिंकल्या होत्या.