'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2024 03:01 PM2024-05-13T15:01:01+5:302024-05-13T15:02:14+5:30

Lok Sabha Election 2024: काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडील अणुबॉम्बची भीती दाखवत केलेल्या विधानापासून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत.

Lok Sabha Election 2024: 'If Pakistan doesn't fill bangles, we will force them to fill bangles': Narendra Modi | 'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   

'पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू', नरेंद्र मोदींचा टोला   

काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पाकिस्तानकडील अणुबॉम्बची भीती दाखवत केलेल्या विधानापासून भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी हे काँग्रेसविरोधात कमालीचे आक्रमक झाले आहेत. आज बिहारमधील मुझफ्फरपूर येथे प्रचारसभेला संबोधित करताना नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला पुन्हा प्रत्युत्तर दिलं आहे. पाकिस्तानने बांगड्या भरल्या नसतील तर आम्ही त्यांना बांगड्या भरण्यास भाग पाडू, असं विधान केलंय तसेच मोदींनी लालूप्रसाद यादव यांच्या कुटुंबालाही मोदींनी लक्ष्य केले. आरजेडीने केवळ घराणेशाही दिलीय. एकेकाळी येतए आरजेडीचं जंगलराज होतं, असा आरोप नरेंद्र मोदी यांनी केला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हाजीपूर येथे प्रचारसभेला संबोधित करताना म्हणाले की, एनडीएला दिलेलं तुमचं प्रत्येक मत हे केंद्रात मोदींचं भक्कम सरकार बनवेल. तर आरजेडी, काँग्रेस किंवा इंडी आघाडीला दिलेलं प्रत्येक मत तसंही वाया जाणार आहे. त्यामुळे तुमचं मत हे सरकार बनवण्यासाठी द्या, देश बनवण्याठी द्या, आपल्या मुलांच्या उज्जव भविष्यासाठी मतदान करा, असं आवाहन नरेंद्र मोदी यांनी केलंय. 

मोदी पुढे म्हणाले की, मी तुम्हाला दुप्पट नफा देणारी एक योजना आखली आहे. या योजनेमुळे तुमच्या घरातील विजेचं बिल शून्य होईल. या योजनेचं नाव आहे. पीएम सूर्यघर मोफत वीज योजना. याअंतर्गत घराच्या छप्परावर सोलर पॅनल लावण्यासाठी सरकार तुम्हाला ७५ हजार रुपये देईल. जेवढी वीज हवी असेल तेवढी वापरा. उरलेली वीज सरकारला विका. म्हणजे वीजबिल शून्य होईल. तसेच उत्पन्नही मिळेल.  

काँग्रेसच्या काळात एका एलईडी बल्बची किंमत ४०० रुपये होती. आम्ही त्याची किंमत कमी करून ती ४०-५० रुपयांपर्यंत खाली आणली. घरोघरी स्वस्त एलईडी बल्ब देऊन सरकारने गरीब आणि मध्यमवर्गीयांचे २० हजार कोटी रुपये वाचवले आहेत. यावेळी लालूंच्या कार्यकाळावर टीका करताना मोदी म्हणाले की, जंगलराजमधील जीवन हे खूप भयानक होते. आरजेडीच्या जंगलराजने बिहारला अनेक दशके मागे ढकलले होते. एनडीएच्या सरकारमुळे बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था रुळावर आली आहे, असेही मोदी म्हणाले.  

Web Title: Lok Sabha Election 2024: 'If Pakistan doesn't fill bangles, we will force them to fill bangles': Narendra Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.