बिहारमध्ये इंडिया आघाडी, एनडीएमध्ये थेट लढत, राजद लढवणार २६ जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2024 07:47 AM2024-03-31T07:47:16+5:302024-03-31T07:48:36+5:30

Lok Sabha Election 2024: बिहारमधील लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीतील जागांची जुळवाजुळव होताच, 'राजद'ने आपल्या कोट्यातील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी बहुतेकांची नावे निश्चित केली आहेत.

Lok Sabha Election 2024: India Alliance in Bihar, direct fight in NDA, RJD will contest 26 seats | बिहारमध्ये इंडिया आघाडी, एनडीएमध्ये थेट लढत, राजद लढवणार २६ जागा

बिहारमध्ये इंडिया आघाडी, एनडीएमध्ये थेट लढत, राजद लढवणार २६ जागा

- एस. पी. सिन्हा 

पाटणा - बिहारमधील लोकसभा निवडणुकीसाठी महाआघाडीतील जागांची जुळवाजुळव होताच, 'राजद'ने आपल्या कोट्यातील २६ लोकसभा मतदारसंघांपैकी बहुतेकांची नावे निश्चित केली आहेत.

बिहारमधील जागावाटपात राजदला २६ जागा, काँग्रेसला ९ आणि डाव्या पक्षांना (भाकपा माले, भाकपा आणि माकपा) ५ जागा मिळाल्या आहेत. भाकपा-माले नालंदा, आरा आणि काराकाट या तीन जागांवर लढणार आहे. आरामधून सुदामा प्रसाद, काराकाटमधून राजाराम सिंह आणि नालंदामधून संदीप सौरभ यांना उमेदवारी जाहीर केली.

गया येथून कुमार सर्वजीत, औरंगाबादमधून अभय कुशवाह, नवादामधून श्रवण कुशवाह, जमुईमधून अर्चना रविदास यांना आधीच मैदानात उतरविण्यात आले आहे. बिहारमध्ये इंडिया आघाडी आणि एनडीएमध्ये थेट लढत असणार आहे.जहानाबादमधून सुरेंद्र यादव आणि पाटलीपुत्रमधून मिसा भारती यांची नावे आधी निश्चित करण्यात आली आहेत, तर बिमा भारती पूर्णियामधून निवडणूक लढविण्याच्या तयारीत आहेत. त्याचवेळी वैशाली येथून अन्नू शुक्ला (मुन्ना शुक्ला यांची पत्नी), सारण येथून रोहिणी आचार्य, उजियारपूर येथून आलोक मेहता, सिवानमधून अवध बिहारी चौधरी हे रिंगणात असतील. राजद गया, नवादा, जहानाबाद, औरंगाबाद, वाल्मीकीनगर, पाटलीपुत्र, मुंगेर, जमुई, बांका, अररिया, पूर्व चंपारण, शिवहर, सीतामढी, वैशाली, सारण, सिवान, गोपालगंज, उजियारपूर, दरभंगा, मधुबनी, झंझारपूर, सुपौल, मधेपुरा, अररिया, हाजीपूर आणि पूर्णिया येथून उमेदवार देणार आहे.
 

Web Title: Lok Sabha Election 2024: India Alliance in Bihar, direct fight in NDA, RJD will contest 26 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.