पोस्ट बॅलेट्सच्या मोजणीबाबत कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 05:12 PM2024-06-01T17:12:55+5:302024-06-01T17:13:42+5:30

Lok Sabha Election 2024: अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आता थोड्या वेळातच आटोपणार आहे. तसेच आता सर्वांचं लक्ष ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पोस्ट बॅलेट्सच्या मजमोजणीबाबतच्या नियमांमध्ये केलेल्या फेरबदलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Lok Sabha Election 2024: Kapil Sibal raised a question mark regarding the counting of post ballots, said... | पोस्ट बॅलेट्सच्या मोजणीबाबत कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले...

पोस्ट बॅलेट्सच्या मोजणीबाबत कपिल सिब्बल यांनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, म्हणाले...

अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठीची मतदान प्रक्रिया आता थोड्या वेळातच आटोपणार आहे. तसेच आता सर्वांचं लक्ष ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे लागलं आहे. दरम्यान, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वरिष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी पोस्ट बॅलेट्सच्या मजमोजणीबाबतच्या नियमांमध्ये केलेल्या फेरबदलांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. बदलेल्या नियमांमुळे मतमोजणीमध्ये फेरफार करणं सोपं होणार आहे, असा दावा सिब्बल यांनी केला. राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी किती मतं पडलेली आहे हे मतमोजणी केंद्रांवर फॉर्म १७ सी मध्ये पाहिले पाहिजे. याशिवाय मतमोजणीशी संबंधित फॉर्मवरील प्रत्येक बाबीवर लक्ष दिलं पाहिजे, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

पोस्टल बॅलेट्सच्या मोजणीबाबतच्या नियमांमध्ये कााही बदल करण्यात आले आहेत. तसेच निवडणूक आयोगाने याबाबत विस्तृत मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध केल्या आहेत. नियमांनुसार पोस्टल बॅलेटची मोजणी अंतिम फेरीपूर्वी होते. मात्र निवडणूक आयोगाने मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला असून, आता पोस्टल बॅलेटची कधीही मोजणी होऊ शकते, असा आदेश दिले आहेत. कपिल सिब्बल यांनी सांगितले की, आता पोस्टल बॅलेटची संख्या ही आधीपेक्षा अधिक वाढली आहे. त्यामुळे अटीतटीच्या आणि कमी फरकाने जय पराजयाचं अंतर निश्चित होणाऱ्या भागात पोस्टल बॅलेटच्या मोजणीमध्ये फेरफार होऊ शकतो. नियमांमध्ये बदल झाल्यानंतर मतांच्या मोजणीमध्ये हेराफेरी होऊ शकते. 

दरम्यान, लोकसभा निवडणुकीचं मतदान आटोपत असताना इंडिया आघाडीच्या बड्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक सुरू आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीत अनेक बडे नेते सहभागी झाले आहेत. तसेच या बैठकीत मतमोजणी आणि मतमोजणीनंतरच्या रणनीतीवर चर्चा होण्याची शक्यता आहे.  

Web Title: Lok Sabha Election 2024: Kapil Sibal raised a question mark regarding the counting of post ballots, said...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.