गरीब, महिला युवा, शेतकरी व वंचित घटकांच्या सेवेसाठी सज्ज; NDA चा ठराव, मोदी हेच प्रमुख नेते

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 06:39 PM2024-06-05T18:39:12+5:302024-06-05T18:40:29+5:30

Pm Narendra Modi :  नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर दुसऱ्या दिवशी झालेल्या एनडीएच्या बैठकीत एकमताने हा निर्णय घेण्यात आला.

lok sabha election 2024 NDA leaders formally elect PM Modi as the alliance leader | गरीब, महिला युवा, शेतकरी व वंचित घटकांच्या सेवेसाठी सज्ज; NDA चा ठराव, मोदी हेच प्रमुख नेते

गरीब, महिला युवा, शेतकरी व वंचित घटकांच्या सेवेसाठी सज्ज; NDA चा ठराव, मोदी हेच प्रमुख नेते

Pm Narendra Modi ( Marathi News ) :  काल लोकसभा निवडणुकांचे निकाल समोर आले, एनडीए'ला बहुमत मिळाले असून एनडीएच्या सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू झाल्या आहेत. आज दिल्लीत एनडीए''च्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत नरेंद्र मोदी यांची नेतेपदी निवड करण्यात आली आहे. एनडीएच्या बैठकीनंतर नरेंद्र मोदी हेच पंतप्रधानपदाचे उमेदवार असतील हे स्पष्ट झाले आहे. 

लोकसभा निवडणुकीचे निकाल काल मंगळवारी ४ जून रोजी जाहीर झाले आहेत. एनडीए आघाडीला २९३ जागा मिळाल्या आहेत. तर इंडिया आघाडीला २३४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. मात्र, निवडणुकीचे निकाल आल्यानंतर सरकारबाबत २४ तासांपासून सुरू असलेला सस्पेंस संपला आहे. आता देशात इंडिया आघाडीचे सरकार स्थापन होण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.

एनडीएची दिल्लीत बैठक

आज दिल्लीत एनडीएच्या नेत्यांची बैठक झाली. या बैठकीत एनडीएने ठराव केले, ठरावात म्हटले आहे की, “आम्हा सर्वांना अभिमान आहे की एनडीएने २०२४ च्या लोकसभा निवडणुका नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एकजुटीने लढल्या आणि जिंकल्या. आपण सर्वांनी एकमताने एनडीएचे नेते नरेंद्र मोदींना आपला नेता म्हणून निवडले आहे. मोदींच्या नेतृत्वाखालील एनडीए सरकार भारतातील गरीब, महिला, तरुण, शेतकरी आणि शोषित, वंचित आणि पीडित नागरिकांच्या सेवेसाठी कटिबद्ध आहे. भारताचा वारसा जपून आणि देशाच्या सर्वांगीण विकासासाठी एनडीए सरकार भारतातील लोकांचे जीवनमान उंचावण्यासाठी काम करत राहील, असंही या ठरावात म्हटले आहे.

नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेणार

तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेताच नरेंद्र मोदींच्या नावावर एक नवा विक्रम होणार आहे. सलग तिसऱ्यांदा निवडणूक जिंकून देशाचे पंतप्रधान होणारे ते देशातील दुसरे नेते बनतील. यापूर्वी हा विक्रम जवाहरलाल नेहरूंच्या नावावर होता. आज दुपारी ४ वाजता दिल्लीत एनडीएची बैठक बोलावण्यात आली आहे. यात जेडीयू प्रमुख नितीश कुमार, टीडीपी प्रमुख एन चंद्राबाबू नायडू आणि इतर नेते सहभागी होणार आहेत. एनडीएच्या मित्रपक्षांशी चर्चेनंतर भाजपच्या संसदीय मंडळाची बैठक होणार आहे. यामध्ये सरकार स्थापनेची रुपरेषा आणि शपथविधी यावर चर्चा होणार आहे. 

Web Title: lok sabha election 2024 NDA leaders formally elect PM Modi as the alliance leader

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.