भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 4, 2024 10:12 AM2024-05-04T10:12:28+5:302024-05-04T10:14:21+5:30
६० टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार मतदारसंघात असल्याची बाब दिसून येते. एकूण जातीय व धार्मिक समीकरणे लक्षात घेऊन तृणमूलकडून येथे युसुफ पठाणला उमेदवारी देण्यात आली आहे.
योगेश पांडे
बहरामपूर : काँग्रेसचा बालेकिल्ला मानण्यात येणाऱ्या बहरामपूर येथे यंदा तिरंगी लढत दिसून येत आहे. लोकसभेतील काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांच्यासमोर भाजपचे डॉ. निर्मल चंद्र साहा व क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या रिंगणात उतरलेले युसुफ पठाण यांचे मोठे आव्हान आहे. पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे या मतदारसंघाकडे संपूर्ण देशाच्या नजरा लागलेल्या आहेत.
६० टक्क्यांहून अधिक मुस्लिम मतदार मतदारसंघात असल्याची बाब दिसून येते. एकूण जातीय व धार्मिक समीकरणे लक्षात घेऊन तृणमूलकडून येथे युसुफ पठाणला उमेदवारी देण्यात आली आहे. अधीर रंजन चौधरी १९९९ पासून या मतदारसंघातून निवडून येत आहेत. यंदा भाजपने त्यांच्यासमोर डॉक्टर साहा यांना उभे केले आहे. विकास व सीएएच्या मुद्द्यावर त्यांचा प्रचार सुरू आहे.
निवडणुकीतील कळीचे मुद्दे
काँग्रेसने सलग दोन वेळा विजय मिळविला असला तरी २०२१ च्या विधानसभा निवडणुकीत येथील सातपैकी सहा जागांवर तृणमूलची सरशी.
बेरोजगारी, शिक्षणाचा अभाव व मजुरीसाठी होणारे स्थलांतर हे मतदारसंघातील मोठे प्रश्न असून याबाबत फारशी पावले उचलण्यात आलेली नाहीत.
युसुफच्या उमेदवारीला स्थानिक नेत्यांकडून विरोध झाला होता. त्यामुळे अंतर्गत गटबाजीचा फटका बसण्याची भीती.
२०१९ मध्ये काय घडले?
अधीर रंजन चौधरी
काँग्रेस (विजयी)
५,९१,१०६
अपूर्ब सरकार
तृणमूल काँग्रेस
५,१०,४१०