PM मोदी कन्याकुमारीत, अमित शाह बालाजी मंदिरात अन् नड्डा कुलदेवीच्या चरनी नतमस्तक...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2024 02:49 PM2024-05-31T14:49:49+5:302024-05-31T14:51:09+5:30

लोकसभा निवडणुकीचा प्रचार थांबल्यानंतर दिग्गज नेत्यांची देवाकडे धाव.

Lok Sabha Election २०२४ : PM Modi bows in Kanyakumari, Amit Shah in Balaji Temple and JP Nadda in Kuldevi temple | PM मोदी कन्याकुमारीत, अमित शाह बालाजी मंदिरात अन् नड्डा कुलदेवीच्या चरनी नतमस्तक...

PM मोदी कन्याकुमारीत, अमित शाह बालाजी मंदिरात अन् नड्डा कुलदेवीच्या चरनी नतमस्तक...

Lok Sabha Election २०२४ : लोकसभा निवडणूक अंतिम टप्प्यात आली आहे. उद्या म्हणजेच १ जून रोजी सातव्या अन् शेवटच्या टप्प्यातील मतदान होत असून, ३० मे रोजी लोकसभेचा प्रचारदेखील थांबला. दरम्यान, हा प्रचार संपताच अनेक नेते देवाचा धावा घेताना दिसत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारीतील विविकानंतर मेमोरिअल रॉक येथे ध्यान करण्यासाठी गेले, तर गृहमंत्री अमित शाहंनी कुटुंबासह तिरुपती बालाजीचे दर्शन घेतले. तसेच, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनीदेखील आपल्या कुटुंबासह बिलासपूर येथे कुलदेवीच्या मंदिरा पूजा केली.

पीएम मोदी 45 तास ध्यान करणार
शुक्रवारी निवडणूक प्रचार संपल्यानंतर पंतप्रधान मोदी थेट कन्याकुमारी येथे पोहोचले आणि स्वामी विवेकानंद रॉक मेमोरियलच्या ध्यान मंडपममध्ये ध्यानस्त झाले. यापूर्वी कन्याकुमारी येथे पोहोचल्यानंतर त्यांनी प्रथम कन्याकुमारी देवीला समर्पित असलेल्या भगवती अम्मान मंदिरात प्रार्थना केली. पंतप्रधान मोदींनी गुरुवारी संध्याकाळी सुमारे 6.45 वाजता विवेकानंद रॉक मेमोरियल येथे ध्यान सुरू केले, जे 1 जूनच्या संध्याकाळपर्यंत सुरू राहील. पीएम मोदी त्याच खडकावर बसून ध्यान करत आहेत, ज्यावर विवेकानंदांनी ध्यान केले होते. या काळात पीएम मोदी फक्त नारळ पाणी आणि द्राक्षाचा रस घेणार आहेत.

अमित शाह बालाजीच्या चरनी नतमस्तक
पंतप्रधानांव्यतिरिक्त भाजपचे इतर नेतेही मंदिरांना भेटी देत ​​आहेत. गृहमंत्री अमित शाह आणि त्यांची पत्नी सोनल शाह यांनी शुक्रवारी तिरुपती बालाजी येथे दर्शन घेतले. तिरुमला-तिरुपती देवस्थानम (TTD) चे कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी यांनी मंदिराच्या प्रवेशद्वारावर त्यांचे स्वागत केले. शाह दाम्पत्य यांनी दिवसभर मंदिरातील विविध कार्यक्रमात भाग घेतला होता. दर्शनानंतर मंदिराच्या पुजाऱ्यांनी शाह यांना वैदिक मंत्रांचा आशीर्वाद दिला. 

नड्डा कुलदेवीच्या मंदिरात
भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनीदेखील गुरुवारी आपल्या कुटुंबासह बिलासपूर येथील शक्तीपीठ श्री नैना देवी मंदिरात जाऊन दर्शन घेतले. येथे त्यांनी विधीपूर्वक माता राणीची पूजा केली. सोशल मीडियावर फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले की, 'आज मला हिमाचल प्रदेशातील देवभूमीच्या बिलासपूरमधील माझ्या कुटुंबासह कुलदेवी मंदिर आणि आदिशक्ती माँ नैना देवी जी मंदिराला भेट देण्याचे भाग्य लाभले. शिवालिक पर्वत रांगेत वसलेल्या या प्रसिद्ध शक्तीपीठात उपासना केल्याने लोकांमध्ये नेहमीच नवीन ऊर्जा आणि समर्पण निर्माण होते. यावेळी सर्व देशवासीयांचे सुख, सौभाग्य, आरोग्य आणि भरभराटीसाठी माता राणीने सर्वांना आशीर्वाद देवो अशी प्रार्थना केली.'

Web Title: Lok Sabha Election २०२४ : PM Modi bows in Kanyakumari, Amit Shah in Balaji Temple and JP Nadda in Kuldevi temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.