"...104वी शिवी, फरक पडत नाही"; संजय राऊतांच्या 'औरंगजेब' वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2024 10:08 AM2024-03-21T10:08:03+5:302024-03-21T10:09:59+5:30

मोदी म्हणाले, विरोधकांनी औरंगजेब म्हणून 104व्या वेळा अपशब्द वापरला आहे. याने काही होणार नाही, कारण आम्ही लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू.

lok sabha election 2024 Prime Minister Narendra Modi's counterattack on sanjay raut aurangzeb statemen | "...104वी शिवी, फरक पडत नाही"; संजय राऊतांच्या 'औरंगजेब' वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा पलटवार

"...104वी शिवी, फरक पडत नाही"; संजय राऊतांच्या 'औरंगजेब' वक्तव्यावरून पंतप्रधान मोदींचा पलटवार

शिवसेना (उद्धव ठाके गट) नेते तथा खासदार संजय राऊत यांच्या 'औरंगजेब' वक्तव्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (20 मार्च) थेट विरोधी आघाडीवरच निशाणा साधला आहे. मोदी म्हणाले, विरोधकांनी औरंगजेब म्हणून 104व्या वेळा अपशब्द वापरला आहे. याने काही होणार नाही, कारण आम्ही लोकसभा निवडणुकीत विजय मिळवू.

पंतप्रधान नरेंद्र मोदी न्यूज18 रायजिंग भारत समिटमध्ये बोलताना म्हणाले, "आम्ही पुढील 25 वर्षांचा रोडमॅप तयार करत आहोत आणि आपल्या तिसऱ्या टर्मच्या पहिल्या 100 दिवसांचा प्लॅनही तयार करत आहोत. दुसऱ्या बाजूला आमचे विरोधकही नवे विक्रम निर्माण करत आहेत. त्यांनी आजच मोदींना 104वी शिवी दिली आहे. औरंगजेब म्हणत गौरवण्यात आले आहे. माझी खोपडी उडवण्याचे आवाहन करण्यात आले आहे." 

मोदी म्हणाले, आपण आज विकिसित भारत आणि आत्मनिर्भर भारतासंदर्भात बोलत आहोत. केवळ 10 वर्षांत 25 कोटी लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत. भारतीय अर्थव्यवस्था 11व्या क्रमांकावरून 5व्या क्रमांकावर पोहोचली आहे. हे तर काहीच नाही, अजून आणखी पुढे जायचे आहे.''

विरोधकांवर मोदींचा निशाणा -  
पंतप्रधान मोदी म्हणाले, आज गरीब मला आशीर्वाद देत असताना, वोरोधकांच्या मनात शिव्या येत आहेत. हे लोक आज त्या गरिबांनाही शिव्या देत आहेत आणि मलाही. मात्र, त्या शिव्यांनी मला काही फरक पडणार नाही. कारण लोक आमच्यासोबत आहेत. 

काय म्हणाले होते संजय राऊत? -
संजय राऊत म्हणाले, "महाराष्ट्र यासाठी मोठा आहे, कारण या मातीत छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले, यामुळे या महाराष्ट्राला इतिहास आहे. आणि आज जे महाराष्ट्रावर चाल करून येत आहेत. ते गुजरातचे राज्यकर्ते मोदी असतील किंवा शाह असतील. महाराष्ट्रात छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आले आणि औरंगजेबाचा जन्म गुजरातमध्ये झाला. गुजरातमध्ये जेथे मोदी जन्माला आले, त्याच्या बाजूला दाहोद नावाचे गाव आहे. तेथे औरंगजेब जन्माला आला. म्हणून ही औरंगजेबी वृत्ती गुजरात आणि दिल्लीतून महाराष्ट्रावर चाल करून येत आहे. शिवसेनेच्या विरोधात आणि आमच्या स्वाभिमानाच्या विरोधात." यावेळी, समोरील कार्यकर्त्यांमधून एकेरी नावाने 'मोदी आला मोदी, अशी हाक आली. यावर, मोदी आला नाही, 'औरंगजेब आला म्हणा', असे राऊतांनी म्हटले आहे. 
 

Web Title: lok sabha election 2024 Prime Minister Narendra Modi's counterattack on sanjay raut aurangzeb statemen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.