भाजपाचे बहुमत हुकले, एनडीएला सत्ता; नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे आभार, पुढील सरकारबाबत म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 19:52 IST2024-06-04T19:51:05+5:302024-06-04T19:52:10+5:30
Lok Sabha Election 2024 Result: एनडीएचा विजय निश्चित झाल्यानंतर नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशवासियांचे आभार मानले आहेत.

भाजपाचे बहुमत हुकले, एनडीएला सत्ता; नरेंद्र मोदींनी मानले देशवासीयांचे आभार, पुढील सरकारबाबत म्हणाले...
अठराव्या लोकसभा निवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता अंतिम टप्प्यात पोहोचली असून, आतापर्यंत आलेल्या कलांमधून भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंत भाजपाला २३९ जागांवर आघाडी मिळाली असून, भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएला २९३ जागांवर आघाडी मिळाली आहे. त्यामुळे सध्याच्या समिकरणांनुसार एनडीएकडे बहुमत असून, या यशानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत देशवासियांचे आभार मानले आहेत.
एनडीएचा विजय निश्चित झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. देशातील जनतेने एनडीएवर सलग तिसऱ्यांदा आपला विश्वास व्यक्त केला आहे. भारताच्या इतिहासामध्ये हा अभूतपूर्व क्षण आहे. मी हे प्रेम आणि आशीर्वादासाठी माझ्या परिवारजनांना नमन करतो. मी देशवासियांना हा विश्वास देऊ इच्छितो की, त्यांच्या आशा आकांक्षांना पूर्ण करण्यासाठी आम्ही नवी ऊर्जा, नवी उमेद आणि नव्या संकल्पांसह पुढे जाणार आहोत.
या निवडणुकीमध्ये सर्व कार्यकर्त्यांनी ज्या समर्पण भावनेने अथक मेहनत केली आहे, मी त्यासाठी त्यांचे आभार मानतो. तसेच त्यांचं अभिनंदन करतो, अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.