Lok Sabha Election 2024 Result अब की बार, पूर्णच चुकला अंदाज; 'एक्झिट पोल' करणारे 'ॲक्सिस माय इंडिया'चे प्रदीप गुप्ता ढसाढसा रडले!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 05:12 PM2024-06-04T17:12:29+5:302024-06-04T17:15:09+5:30

बहुतांश एक्झिट पोल्सने भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला होता.

Lok Sabha Election 2024 Result Pradeep Gupta of Axis My India cried after Exit Poll as results defy exit polls | Lok Sabha Election 2024 Result अब की बार, पूर्णच चुकला अंदाज; 'एक्झिट पोल' करणारे 'ॲक्सिस माय इंडिया'चे प्रदीप गुप्ता ढसाढसा रडले!

Lok Sabha Election 2024 Result अब की बार, पूर्णच चुकला अंदाज; 'एक्झिट पोल' करणारे 'ॲक्सिस माय इंडिया'चे प्रदीप गुप्ता ढसाढसा रडले!

Lok Sabha Election Result ( Marathi News ) : लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीच्या अनेक फेऱ्या पार पडल्यानंतर आता देशातील राजकीय चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झालं आहे. यंदा एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं असलं तरी भाजप स्वबळावर बहुमताचा जादुई आकडा गाठण्यास अपयशी ठरला आहे. या निवडणुकीसाठी १ जून रोजी मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर विविध संस्थांचे एक्झिट पोल आले होते. यातील बहुतांश पोल्सने भाजपला ऐतिहासिक बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला होता. यामध्ये ॲक्सिस माय इंडिया या संस्थेने तर एनडीएला ३६१ ते ४०१ जागा मिळतील असा दावा केला होता. मात्र हा दावा आता निकालानंतर चुकीचा ठरत असल्याचं पाहून या संस्थेचे प्रमुख प्रदीप गुप्ता हे टीव्ही चॅनेलच्या चर्चेदरम्यान ढसाढसा रडल्याचं पहायला मिळालं. हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शनिवारी प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलपैकी इंडिया टुडे ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये,  इंडिया आघाडीला १३१ ते १६६ जागा देण्यात आल्या होत्या. तर इतरांना ८ ते २० जागा मिळतील असा दावा करण्यात आला होता. पश्चिम बंगाल, ओदिशा, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि महाराष्ट्रामध्ये भाजप आणि एनडीएला अनपेक्षितरीत्या जास्त जागा मिळतील, असाही अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र आज प्रत्यक्षात निकाल आल्यानंतर हा अंदाज पूर्णपणे चुकला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी आपला गड राखत दमदार यश मिळवलं. तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीने भाजपप्रणित महायुतीचा धुव्वा उडवत तब्बल २९ जागांवर आघाडी घेतली आहे.

महाराष्ट्राबाबत काय होता अॅक्सिस माय इंडियाचा अंदाज?

महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या विजयाचं भाकित करण्यात आलं होतं. इंडिया टुडेच्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला २८ ते ३२ आणि महाविकास आघाडीला १६ ते २० जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली होतं. पक्षनिहाय जागा पाहायच्या झाल्यास भाजपला २० चे २२ जागा, शिवसेना शिंदे गट ८ ते १०, अजित पवार गट १ ते २, शिवसाना ठाकरे गट ९ ते ११, शरद पवार गट ३ ते ५ आणि काँग्रेसला ३ ते ४ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. 
 

Web Title: Lok Sabha Election 2024 Result Pradeep Gupta of Axis My India cried after Exit Poll as results defy exit polls

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.