Akhilesh Yadav : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांची मोठी मागणी; भाजपावर गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 10:46 AM2024-04-01T10:46:24+5:302024-04-01T10:53:23+5:30

Lok Sabha Election 2024 And Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांनी ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. यासोबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे.

Lok Sabha Election 2024 samajwadi party akhilesh yadav demands ed cbi and income tax should act within law | Akhilesh Yadav : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांची मोठी मागणी; भाजपावर गंभीर आरोप

Akhilesh Yadav : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव यांची मोठी मागणी; भाजपावर गंभीर आरोप

समाजवादी पक्षाचे नेते आणि यूपीचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी ईडी, सीबीआय आणि आयकर विभागाच्या कारवाईवर प्रतिक्रिया दिली आहे. यासोबत त्यांनी निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी केली आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्यांनी याबाबत ट्विट केलं आहे. तसेच अखिलेश यांनी भाजपावर गंभीर आरोपही केले आहेत.

"E = ED C = CBI I = IT. ईडी, सीबीआय आणि आयटी विभागाची पहिली अक्षरं एकत्र करून ज्या प्रकारे ECI तयार होतो, तो खरं तर या गोष्टीचा सकारात्मक इशारा आहे की, ‘Election Commission of India’ हा आशेचा किरण आहे, जो भाजपा सरकारद्वारे केल्या जाणाऱ्या ED, CBI आणि IT डिपार्टमेंटच्या दुरुपयोगावर यापुढे लगाम लावू शकतो."

"आजपासून आपण 2024 च्या सुरुवातीच्या निवडणुकीच्या महिन्यात प्रवेश करत आहोत. निवडणूक आयोग आपली घटनात्मक जबाबदारी पार पाडत असताना बेलगाम आणि बेईमान सरकारी यंत्रणेला सक्रीय होऊ देणार नाही आणि नेहमीप्रमाणे लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी ढाल म्हणून काम करेल, अशी आशा आहे. लोकशाही टिकेल तेव्हाच निवडणूक आयोगाची प्रतिष्ठा अबाधित राहील."

"निष्पक्ष निवडणुका निर्भयपणे पार पाडण्यासाठी आणि पक्षपात किंवा भेदभाव न करता सर्व पक्षांना निवडणूक लढवण्याची समान संधी दिल्याबद्दल निवडणूक आयोगाचे हार्दिक अभिनंदन! निष्पक्ष निवडणुका, निवडणूक आयोगाचा विजय होईल"  असं अखिलेश यादव यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 
 

Web Title: Lok Sabha Election 2024 samajwadi party akhilesh yadav demands ed cbi and income tax should act within law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.