"मी भाग्यवान..."; निवडणूक प्रचारासाठी बहिणींकडून गहू, पैसे मिळाल्यावर शिवराज सिंह चौहान भावूक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2024 10:33 AM2024-05-02T10:33:08+5:302024-05-02T10:41:02+5:30
Lok Sabha Election 2024 And Shivraj Singh Chouhan : माजी मुख्यमंत्री शिवराज बुधवारी रोजी सिहोर जिल्ह्यातील ग्रामीण भागात होते, तेथे महिलांनी त्यांना रोख रकमेसह गव्हाची पोती दिली आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी हे सर्व देत असल्याचं सांगितलं.
मध्य प्रदेशातील विदिशा लोकसभा मतदारसंघात माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे उमेदवार शिवराज सिंह चौहान यांना निवडणूक लढवण्यात मदत करण्यासाठी महिला पुढे येत आहेत. येथे काही जण शिवराजसिंह चौहान यांना गव्हाची पोती आणि काही रोख रक्कम देत आहेत. माजी मुख्यमंत्री शिवराज बुधवारी (1 मे) रोजी सिहोर जिल्ह्यातील ग्रामीण भागात होते, तेथे महिलांनी त्यांना रोख रकमेसह गव्हाची पोती दिली आणि निवडणुकीच्या प्रचारासाठी हे सर्व देत असल्याचं सांगितलं.
माजी मुख्यमंत्री हे सर्व लोकांचं प्रेम पाहून अत्यंत भावूक झाले आणि म्हणाले की, बहिणींनी आज गव्हाची पोती दिली आहेत, ते हे का देत आहेत, असं बहिणींना विचारलं असता बहिणींनी सांगितलं की, भाऊ, हे तुमच्या निवडणुकीसाठी आहे. गव्हाची ही पोती येथे ठेवणार असून निवडणूक जिंकल्यानंतर येथे जेवण होणार आहे, त्यासाठी मीही येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
जन आशीर्वाद यात्रा में बहनों का भरपूर प्रेम और आशीर्वाद मिल रहा है। जब एक गांव से दूसरे गांव पहुंचता हूं तो बहनें सारे काम छोड़कर आशीर्वाद देने दौड़ी चली आती हैं।
— Shivraj Singh Chouhan (मोदी का परिवार ) (@ChouhanShivraj) May 1, 2024
प्रेम के इतने अलग और सुन्दर रूप देखने मिल रहे हैं कि मन श्रद्धा से बहनों के चरणों में झुक जाता है। कोई बहन 10 रुपए… pic.twitter.com/pdT6QNihIo
माझ्या बहिणी त्यांच्याकडचे पैसे मला काढून काढून देत आहेत. दादा हे दहा रुपये तुमच्या निवडणूक प्रचारासाठी आहेत असं म्हणतात. जेव्हा नेता निवडणूक लढवतो तेव्हा तो पैसे मागतो, पण मी खूप भाग्यवान भाऊ आहे, ज्याच्याकडे अशा बहिणी आहेत ज्या आपल्या कष्टातून पैसे गोळा करून निवडणूक लढवण्यासाठी ते पैसे देत आहेत.
भाजपाचे उमेदवार शिवराज चौहान विदिशा-रायसेन लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सर्व विधानसभा मतदारसंघात जनआशीर्वाद यात्रा काढून मतदारांपर्यंत पोहोचत आहेत. या भेटींमध्ये लहान मुले आणि महिलांना त्यांच्याबद्दल विशेष आपुलकी असते. सिलवानीच्या आधी, विदिशा, गंजबासोडा आणि सांची येथे काढलेल्या यात्रेत मुलांनी त्यांना त्यांच्या पिग्गी बँक दिल्या आणि काही ठिकाणी महिलांनी त्यांना 10 आणि 20 रुपये दिले.