NDA की INDIA लोकसभेला कुणाचे पारडे जड असेल? काँग्रेस किमया करेल की, भाजपची जादू चालेल?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2023 12:24 PM2023-12-24T12:24:07+5:302023-12-24T12:24:57+5:30

Lok Sabha Election 2024 NDA Vs INDIA: भारतातील आगामी लोकसभा निवडणुकीकडे जगाचे लक्ष आहे, असे सांगितले जात आहे.

lok sabha election 2024 who will be more difficult will congress do alchemy or will bjp magic work know about what opinion poll said | NDA की INDIA लोकसभेला कुणाचे पारडे जड असेल? काँग्रेस किमया करेल की, भाजपची जादू चालेल?

NDA की INDIA लोकसभेला कुणाचे पारडे जड असेल? काँग्रेस किमया करेल की, भाजपची जादू चालेल?

Lok Sabha Election 2024 NDA Vs INDIA ( Marathi News ): अलीकडे झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभेच्या निवडणुका या आगामी लोकसभा निवडणुकांची रंगीत तालीम होती, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती. लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्ष आता जोरदार तयारीला लागले आहेत. आघाडी, युती यांच्यात जागा वाटपाची बोलणी अंतिम टप्प्यात येत आहे. यातच या आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीए की विरोधकांची इंडिया आघाडी कुणाचे पारडे जड राहू शकेल, याबाबत कयास बांधले जाऊ लागले आहेत. 

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काही ओपिनियन पोल समोर आले आहेत. यातील सर्व्हेक्षणानुसार, दक्षिण भारत हे भाजपसाठी मोठे आव्हान असू शकते. तर राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि कर्नाटक या राज्याला भाजपची कामगिरी जोरदार होऊ शकते. तेलंगणामध्ये कॉंग्रेसला यश मिळेल, असा दावा सर्व्हेत करण्यात आला आहे. 

कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानात कुणाला किती जागा?

कर्नाटक, छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमधील एकूण ११० जागांपैकी भाजपा ८२ ते ९२ जागा जिंकू शकते, असा अंदाज बांधला गेला आहे. तर दुसरीकडे काँग्रेसला १३ ते २३ आणि इतरांना ४ ते ६ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांपैकी तेलंगणा लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा वरचष्मा राहू शकतो. तर कर्नाटकात भाजप मुसंडी मारू शकेल, असे म्हटले जात आहे.  या दोन राज्यातील ४५ जागांमध्ये भाजप काँग्रेसपेक्षा सरस असल्याचे सर्व्हेत सांगितले गेले आहे. असे असले तरी मागील निवडणुकीपेक्षा काँग्रेसची कामगिती यंदा सुधारू शकते, असे सांगितले जात आहे. 

दरम्यान, छत्तीसगडमधील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली कामगिरी उंचावली आहे. त्याची पुनरावृत्ती लोकसभा निवडणुकीत होण्याची चिन्हे आहेत. या ठिकाणी भाजपाला ११ पैकी ९ ते ११ जागा मिळण्याचा दावा केला जात आहे. तर, राजस्थानमधील लोकसभा निवडणुकीत भाजपाची जादू चालेल अशी अपेक्षा आहे. राजस्थानात भाजपाला २३ ते २५ जागा मिळू शकतील, असे म्हटले जात आहे. तर मध्य प्रदेशात भाजपा पुन्हा दमदार कामगिरी करू शकेल. या ठिकाणी भाजपाला सर्वच्या सर्व २९ जागा मिळण्याचा दावा केला जात आहे. सी-व्होटरने याबाबत सर्व्हे केल्याचे सांगितले जात आहे. 

 

Web Title: lok sabha election 2024 who will be more difficult will congress do alchemy or will bjp magic work know about what opinion poll said

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.