'निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी एका कोपऱ्यात चहाची टपरी चालवतील, भजी विकतील!'
By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2019 11:05 AM2019-04-13T11:05:01+5:302019-04-13T11:33:53+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल बदरुद्दीन अजमल यांनी आक्षेपार्ह भाषा वापरलीय.
लोकसभा निवडणुकीचा प्रचार दणक्यात सुरू आहे. प्रतिस्पर्ध्यांवर, विरोधकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत, टीका-टोले-टोमणेही दणक्यात सुरू आहेत. त्याचवेळी, वादग्रस्त विधानं, जीभ घसरण्याचे प्रकारही काही ठिकाणी होत आहेत. या यादीत आता आसाममधील ऑल इंडिया युनायटेड डेमॉक्रेटिक फ्रंटचे नेते बदरुद्दीन अजमल यांचं नाव जोडलं गेलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल त्यांनी आक्षेपार्ह भाषा वापरलीय.
नरेंद्र मोदींच्या विरोधात जी महाआघाडी तयार झालीय, त्यात आमचा पक्षही आहे. आम्ही सगळे विरोधक मिळून यावेळी मोदींना देशाबाहेर काढू. त्यानंतर एका कोपऱ्यात मोदींची चहाची टपरी असेल. चहासोबत ते भजीही विकतील, अशी अशोभनीय टिप्पणी बदरुद्दीन अजमल यांनी केली आहे. अजमल हे आसाममधील धुबरी मतदारसंघाचे खासदार असून १२ वर्षांपूर्वी त्यांनीच एआययूडीएफची सुरुवात केली होती.
Badruddin Ajmal. All India United Democratic Front (AIUDF) in Chirang, Assam: Modi virodhi jitna gathbandhan hai, hum bhi usme hain, vo sab mil ke Modi ji ko iss desh se bahar nikalega. Modi ji jake kahi na kahi chaye ka dukaan bana ke chalayega, pakoda bhi bechega. (12/4/19) pic.twitter.com/KH5kfgvsQ3
— ANI (@ANI) April 12, 2019
अजमल यांच्याआधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींवर टीका करताना भाजपा खासदार उदय प्रताप सिंह यांचा तोल गेला होता. पूर्वी परदेशात भारतीय व्यक्ती गेली की तिथले लोक म्हणायचे चोरांच्या देशातून आलाय. परंतु, आता मोदींच्या भारतातून आल्याचं बोललं जातं. मोदींनी देशाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. उद्या राहुल गांधी पंतप्रधान झाल्यास, भारताचा पंतप्रधान पप्पू आहे, अशी खिल्ली उडवली जाईल, असं आक्षेपार्ह विधान त्यांनी केलं होतं.
इतर काही वादग्रस्त विधानं...
मला मतदान करा, अन्यथा तुम्हाला शाप देईन https://t.co/WlgihYcyrd
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 12, 2019
मला साथ द्या, नाहीतर...; मेनका गांधींची मुस्लिम मतदारांना धमकी https://t.co/pzLV4Qgk5r
— Lokmat Media Pvt Ltd (@MiLOKMAT) April 12, 2019