'नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; आम्ही दिल्ली काबीज करणार', लालू प्रसाद यादवांचा जोरदार हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2024 06:11 PM2024-03-03T18:11:43+5:302024-03-03T18:12:55+5:30

'नरेंद्र मोदी दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवत आहेत. 15 लाख देतो म्हणत मोदींनी देशाची फसवणूक केली.'

Lok Sabha Election Bihar INDIA Alliance: 'Narendra Modi is not a Hindu; We will capture Delhi', Lalu Prasad Yadav's strong attack | 'नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; आम्ही दिल्ली काबीज करणार', लालू प्रसाद यादवांचा जोरदार हल्लाबोल

'नरेंद्र मोदी हिंदू नाहीत; आम्ही दिल्ली काबीज करणार', लालू प्रसाद यादवांचा जोरदार हल्लाबोल

Bihar INDIA Alliance: बिहारची राजधानी पाटणा येथे काँग्रेस आणि आरजेडीची रॅली सुरू झाली. यावेळी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू यादव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार हल्ला चढवला. 'नरेंद्र मोदी सध्या कुटुंबवादावर टीका करत आहेत. मूळात तुम्हाला कुटुंबच नाही. तुम्ही हिंदूही नाहीत. देशात दोन धर्मांमध्ये द्वेष पसरवत आहात, अशी टीका लालू यादवांनी केली. या रॅलीत राहुल गांधी, अखिलेश यादव यांच्यासह विरोधी पक्षाचे अनेक दिग्गज पोहोचले होते. 

"इधर चला मैं उधर चला... फिसल गया"; तेजस्वी यादव यांचा नितीश कुमारांना खोचक टोला

नितीश कुमारांवर टीका
राजधानी पाटण्यात रविवारी आयोजित जनविश्वास रॅलीत लालू यादव म्हणतात, बिहार जो निर्णय घेतो, देशातील जनता त्याचे पालन करते. तेजस्वीने महाआघाडी सरकारच्या काळात लाखो नोकऱ्या दिल्या. 2017 मध्ये नितीश कुमार महाआघाडीतून एनडीएमध्ये गेले, तेव्हा आम्ही त्यांना पलटूराम म्हटले होते. त्यानंतर आम्ही त्यांचा पुन्हा महाआघाडीत समावेश केला, तीच आमची मोठी चूक होती. आता ते पुन्हा पलटले, तर आमच्याकडूनही त्यांना जोरदार धक्का मिळणार.

दिल्ली काबीज करायची आहे
आरजेडी सुप्रीमो पुढे म्हणाले की, आजच्या रॅलीतील गर्दी पाहून नितीश यांना आणखी आजार होणार. मोदी म्हणाले होते की, सरकार आल्यावर प्रत्येकाच्या खात्यात 15 लाख रुपये येतील. आमचाही विश्वास होता की कदाचित येतील, त्यामुळेच सर्वांचे जन धन खाते उघडले, पण 15 लाख आले नाहीत. मोदींनी देशातील जनतेची फसवणूक केली. सर्व विरोधी पक्ष एकत्र येऊन लोकसभा निवडणुकीत मोदींचा पराभव करणार आणि दिल्ली काबीज करणार, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

Web Title: Lok Sabha Election Bihar INDIA Alliance: 'Narendra Modi is not a Hindu; We will capture Delhi', Lalu Prasad Yadav's strong attack

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.