Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 1, 2024 04:41 PM2024-06-01T16:41:08+5:302024-06-01T21:15:40+5:30

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 Live Updates: लोकसभेच्या ५४३ जागांसाठी देशात सात टप्प्यांमध्ये मतदान झालं. आज शेवटच्या ...

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 Live Updates: PM Narendra Modi or Rahul Gandhi?, NDA or INDIA? maharashtra, mumbai election result predictions | Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा

Lok Sabha Election Exit Poll Results 2024: देशात 'मोदी 3.0' चीच हवा, महाराष्ट्रात मात्र 'कट टू कट' जागा

Lok Sabha Election Exit Poll Results 2024 Live Updates: लोकसभेच्या ५४३ जागांसाठी देशात सात टप्प्यांमध्ये मतदान झालं. आज शेवटच्या टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर विविध वाहिन्या आणि एजन्सी आपले एक्झिट पोलचे आकडे जाहीर करत आहेत. २७२ हा बहुमताचा आकडा कोण गाठू शकेल?, रालोआ विरुद्ध इंडी आघाडी अशा महामुकाबल्यात कोण बाजी मारेल?, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता राखण्यात यशस्वी होतील की विरोधक धक्का देतील?, '४०० पार'चा नारा देणारी भाजपा कुठपर्यंत मजल मारू शकेल?, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल या मोठ्या राज्यांमध्ये काय होणार?, याबद्दल देश-विदेशात उत्सुकता आहे. ४ जूनला या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतीलच; पण देशाचा साधारण कल जाणून घेण्यासाठी एक्झिट पोलकडेही सगळ्यांचं लक्ष आहे. वेगवेगळ्या एक्झिट पोलचा एकत्रित लेखाजोखा घेणारा हा लाइव्ह ब्लॉग... 

02 Jun, 24 : 04:11 PM

देशात सत्ता कुणाची? एक्झिट पोलचे आकडे आले समोर

इंडिया टुडे Axis, एबीपी C-voter, रिपब्लिक भारत PMARQ, रिपब्लिक टीव्ही Matrize, TV9 PollStat, Jan ki Baat, इंडिया न्यूज - D Dynamics या सर्वांचे एक्झिट पोलचे आकडे समोर आले आहेत.

01 Jun, 24 : 10:44 PM

सर्व एक्झिट पोल एका क्लिकवर

बहुतेक सर्वच एक्झिट पोलने भाजपाप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत मिळेल, असा अंदाज वर्तवला आहे. कुठल्या एक्झिट पोलने कुठल्या आघाडीला किती जागा दिल्यात, हे पाहण्यासाठी क्लिक करा.

01 Jun, 24 : 09:51 PM

उत्तर प्रदेशात कुणाची लाट?

देशातील सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशात भाजपाप्रणित एनडीएला ६२ ते ६६ जागा मिळू शकतात, तर इंडी आघाडीला १५ ते १७ जागांवर विजय मिळू शकतो, असा अंदाज एबीपी - सी व्होटर एक्झिट पोलने वर्तवला आहे.  मतांच्या टक्केवारीचा विचार केल्यास एनडीएला ४४ टक्के, 'इंडिया'ला ३७ टक्के आणि बसपाला १४ टक्के मतं मिळतील. 

01 Jun, 24 : 09:42 PM

एनडीए ३५०+, इंडिया १५०+

लोकसभेच्या ५४३ जागांपैकी भाजपाप्रणित एनडीएला ३५३ ते ३८३ जागा, इंडिया आघाडीला १५२ ते १८२ जागा आणि अन्य पक्ष आणि अपक्षांना ४ ते १२ जागा मिळतील, असा अंदाज एबीपी न्यूज - सी व्होटरच्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. 

01 Jun, 24 : 09:06 PM

दिल्लीत भाजपाचा 'षटकार'

इंडिया टुडे - एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार, दिल्लीतील लोकसभेच्या सात जागांपैकी किमान सहा आणि कमाल सातही जागांवर भाजपाचं कमळ फुलेल. भाजपाला ५४ टक्के आणि इंडियाला ४४ टक्के मतं मिळतील, असा अंदाज आहे. 

01 Jun, 24 : 09:03 PM

उत्तराखंड अन् हिमाचलमध्ये 'शत-प्रतिशत'

उत्तराखंडमध्ये तब्बल ६० टक्के मतं मिळवून पाच पैकी पाच जागा भाजपा जिंकेल, असा अंदाज इंडिया टुडे - एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आला आहे. 

01 Jun, 24 : 08:45 PM

अजित पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा मिळणार?


 

01 Jun, 24 : 08:40 PM

एनडीएलाच बहुमत... सगळ्यांचं एकमत

दैनिक भास्कर 

एनडीए - २८१ ते ३५० 
I.N.D.I.A. - १४५ ते २०१
अन्य - ३३ ते ४९ 

जन की बात

एनडीए - ३६२ ते ३९२
I.N.D.I.A. - १४१ ते १६१
अन्य - १० ते २०

एनडीटीव्ही पोल ऑफ पोल्स

एनडीए - ३५८
I.N.D.I.A. - १४८
अन्य - ३७

रिपब्लिक भारत - मॅट्रिझ

एनडीए - ३५३-३६८
I.N.D.I.A. - ११८-१३३
अन्य - ४३-४८

01 Jun, 24 : 08:35 PM

पंजाब 'आप'साठी तापदायक

पंजाबमध्ये १३ पैकी ७ ते ९ जागा काँग्रेसप्रणित 'इंडिया'ला मिळू शकतात, तर आम आदमी पार्टी ० ते २ जागांपर्यंतच मजल मारू शकते, असा अंदाज  India Today-Axis My India च्या एक्झिट पोलमधून वर्तवण्यात आलाय. भाजपाप्रणित एनडीएला 'आप'पेक्षा जास्त, म्हणजेच २ ते ४ जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर शिरोमणी अकाली दल २-३ जागा जिंकू शकतो. 

01 Jun, 24 : 08:18 PM

गोव्यात फिफ्टी-फिफ्टी?

एबीपी न्यूज - सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, गोव्यातील दोन लोकसभा जागांपैकी एनडीए एक किंवा दोन्ही जागा जिंकू शकते. पण, मतांच्या टक्केवारीत इंडी आघाडी पुढे असल्यानं (४५ टक्के एनडीए, ४६ टक्के इंडिया) एखादी जागा त्यांच्या पारड्यातही पडू शकते. 

01 Jun, 24 : 07:51 PM

गुजरातमध्ये भाजपाचीच गर्जना

गुजरातमध्ये भाजपाप्रणित एनडीएला ६३ टक्के मतं मिळतील आणि त्या जोरावर ते २६ पैकी २५ किंवा पैकीच्या पैकी जागा जिंकतील, असा अंदाज India Today-Axis My India च्या एक्झिट पोलने वर्तवला आहे. सूरतमध्ये भाजपा उमेदवाराची बिनविरोध निवड झाली आहेच. इंडी आघाडीला ३३ टक्के मतं मिळतील. 

01 Jun, 24 : 07:30 PM

महाराष्ट्रात महायुती, देशात एनडीए

रिपब्लिक - पीएमएआरक्यू यांच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात महायुतीला २७ ते ३२ जागा मिळतील, तर देशात एनडीए ३५९ जागा जिंकेल. महाविकास आघाडीला १५ ते २० जागांवर विजय मिळेल आणि देशभरात इंडी आघाडीला १५४ जागा जिंकता येतील. 

01 Jun, 24 : 07:26 PM

एनडीए ४०० नाही, पण ३५० पार!

टीव्ही-९ - पोलस्ट्रॅट यांच्या एक्झिट पोलने भाजपाप्रणित एनडीएला स्पष्ट बहुमत दिलं आहे. 

एनडीए- ३५३ ते ३६८
इंडिया- ११८ ते १३३
इतर- ४३ ते ४८

महाराष्ट्रात महायुतीऐवजी मविआला जास्त जागा मिळतील, असा या एक्झिट पोलचा अंदाज आहे
 
महायुती- २२
मविआ- २५
इतर- १

01 Jun, 24 : 07:10 PM

बिहारमध्ये NDA ला फटका

India Today- Axis My India च्या एक्झिट पोलनुसार, बिहारमध्ये इंडी आघाडीला ४८ टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे.  २०१९ मध्ये ४० पैकी ३९ जागा जिंकणाऱ्या एनडीएला यावेळी २९ ते ३३ जागांपर्यंत मजल मारता येईल, तर ७ ते १० जागांवर काँग्रेस आणि मित्रपक्षांना विजय मिळू शकेल. 

01 Jun, 24 : 07:03 PM

महाराष्ट्रात कट टू कट फाईट

एबीपी - सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात उद्धव ठाकरे गटाला ९, शरद पवार गटाला ६ आणि काँग्रेसला ८ अशा महाविकास आघाडीला एकूण २३ जागांवर विजय मिळू शकतो, तर महायुती २४ जागा जिंकू शकते. त्यात भाजपाचं 'कमळ' १७ जागांवर फुलेल, तर शिंदे गट सहा जागा जिंकेल आणि अजित पवार गटाला एका जागेवर समाधान मानावं लागेल.  

01 Jun, 24 : 06:55 PM

कर्नाटकातही भाजपाला 'अच्छे दिन'

इंडिया टुडे - एक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलनुसार कर्नाटकातही भाजपाच्या 'कमळा'लाच 'अच्छे दिन' येताना दिसत आहेत. कर्नाटकातील २८ जागांपैकी २० ते २२ जागा भाजपाला, ३ ते ५ जागा काँग्रेसला, ३ जागा जेडीएसला मिळतील, असा अंदाज आहे.    

01 Jun, 24 : 06:49 PM

आसाम, ईशान्येत भाजपाचाच डंका

आसाममधील १४ जागांपैकी १० ते १२ जागा भाजपाप्रणित एनडीएला मिळतील, तर इंडी आघाडीला २ ते ४ जागा मिळू शकतात, असं एबीपी - सी व्होटरच्या एक्झिट पोलचा अंदाज आहे. त्याचप्रमाणे, ईशान्य भारतातील एकूण ११ जागांपैकी एनडीए ६ ते ९ जागा, इंडिया १ ते ३ जागा तर इतर पक्ष १ ते २ जागा जिंकू शकतील.  
 

01 Jun, 24 : 06:42 PM

तेलंगणात 'कमळा'ची कमाल

एबीपी - सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, तेलंगणातील १७ जागांपैकी एनडी आणि 'इंडिया' या दोन्ही आघाड्या ७ ते ९ जागा जिंकू शकतील. भाजपासाठी हे मोठं यश असल्याचं मानलं जातंय.

01 Jun, 24 : 06:38 PM

केरळ, तामिळनाडूत 'इंडिया' भक्कम

एबीपी - सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार तामिळनाडू राज्यात भाजपाचा चंचूप्रवेश होऊ शकतो. तसंच चित्र केरळमध्येही दिसू शकतं. तामिळनाडूच्या ३९ जागांपैकी इंडी आघाडी ३७ ते ३९ जागा जिंकेल, तर एनडीए ० ते २ जागांवर विजय मिळवू शकेल. त्याचप्रमाणे, केरळमध्ये २० जागांपैकी १७ ते १९ जागा इंडी आघाडीला आणि १ ते ३ जागा एनडीएला मिळू शकतील.

01 Jun, 24 : 06:34 PM

आंध्र प्रदेशात भाजपाची मुसंडी

एबीपी - सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार आंध्र प्रदेशातील २५ पैकी २१ ते २५ जागा भाजपाप्रणित एनडीएला मिळण्याची शक्यता असून 'इंडिया'ला खातंही उघडता येणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जातोय.

01 Jun, 24 : 06:17 PM

मतदान सुफळ संपूर्ण

सातव्या आणि शेवटच्या टप्प्यांतील ५७ जागांसह आज संध्याकाळी सहा वाजता लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया संपूर्ण झालीय. ४ जून रोजी लोकसभा निवडणुकीची मतमोजणी होणार असून निकालाबद्दल फक्त भारतातच नव्हे, तर जगभरात उत्सुकता आहे.

01 Jun, 24 : 04:47 PM

निवडणूक आयोगाची सक्त ताकीद

लोकसभा निवडणुकीच्या सातव्या टप्प्याचं मतदान पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी ६.३० च्या आधी एक्झिट पोलचे थेट प्रक्षेपण करता येणार नाही. या आदेशाचे उल्लंघन केल्यास दोन वर्षांचा तुरुंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात, असे स्पष्ट निर्देश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत.

Web Title: Lok Sabha Election Exit Poll Results 2024 Live Updates: PM Narendra Modi or Rahul Gandhi?, NDA or INDIA? maharashtra, mumbai election result predictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.