Lok Sabha Election: देशातील सर्व राज्यांमध्ये किती टप्प्यांत आणि कधी मतदान?... जाणून घ्या
By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2019 07:16 PM2019-03-10T19:16:01+5:302019-03-10T19:19:11+5:30
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. देशातील निवडणुकांचे टप्पे
बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. 17 व्या लोकसभेसाठी देशातील 29 राज्यांमध्ये 7 टप्प्यांमध्ये मतदान होणार असून या महासंग्रामाचा निकाल 23 मे रोजी जाहीर होईल, अशी घोषणा आज केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. मतदानाचा पहिला टप्पा 11 एप्रिलला असेल तर 19 मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान होईल. या लोकसभा निवडणुकीत सुमारे 90 कोटी मतदार देशाचा नेता, देशाचं सरकार ठरवणार आहेत. महाराष्ट्रात चार टप्प्यांमध्ये लोकसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. अन्य कोणत्या राज्यात, किती टप्प्यांत आणि कधी मतदान होणार आहे याचा आढावा...
अंदमान आणि निकोबार - एक टप्पा - 11 एप्रिल
आंध्र प्रदेश - एक टप्पा - 11 एप्रिल
अरुणाचल प्रदेश - एक टप्पा - 11 एप्रिल
आसाम - तीन टप्पे - 11, 18, 23 एप्रिल
बिहार - सात टप्पे - 11, 18, 23 एप्रिल आणि 6, 12, 19 मे
चंदीगड - एक टप्पा - 19 मे
छत्तीसगड - तीन टप्पे - 11, 18, 23 एप्रिल
दादरा आणि नगर हवेली - एक टप्पा - 23 एप्रिल
दमण आणि दीव - एक टप्पा - 23 एप्रिल
दिल्ली - एक टप्पा - 12 मे
गोवा - एक टप्पा - 23 मे
गुजरात - एक टप्पा - 23 मे
हरयाणा - एक टप्पा - 12 मे
हिमाचल प्रदेश - एक टप्पा - 19 मे
जम्मू आणि काश्मीर - पाच टप्पे - 11, 18, 23, 29 एप्रिल आणि 6 मे
झारखंड - चार टप्पे - 29 एप्रिल आणि 6, 12, 19 मे
कर्नाटक - दोन टप्पे - 18, 23 एप्रिल
केरळ - एक टप्पा - 23 एप्रिल
लक्षद्वीप - एक टप्पा - 11 एप्रिल
मध्य प्रदेश - चार टप्पे - 29 एप्रिल आणि 6, 12, 19 मे
महाराष्ट्र - चार टप्पे - 11, 18, 23, 29 एप्रिल
मणिपूर - दोन टप्पे - 11, 18 एप्रिल
मेघालय - एक टप्पा - 11 एप्रिल
मिझोराम - एक टप्पा - 11 एप्रिल
नागालँड - एक टप्पा - 11 एप्रिल
ओडिशा - चार टप्पे - 11, 18, 23, 29 एप्रिल
पुदुचेरी - एक टप्पा - 18 एप्रिल
पंजाब - एक टप्पा - 19 मे
राजस्थान - दोन टप्पे - 29 एप्रिल, 6 मे
सिक्कीम - एक टप्पा - 11 एप्रिल
तामीळनाडू - एक टप्पा - 18 एप्रिल
तेलंगणा - एक टप्पा - 11 एप्रिल
त्रिपुरा - दोन टप्पे - 11, 18 एप्रिल
उत्तर प्रदेश - सात टप्पे - 11, 18, 23 एप्रिल आणि 6, 12, 19 मे
उत्तराखंड - एक टप्पा - 11 एप्रिल
पश्चिम बंगाल - सात टप्पे - 11, 18, 23 एप्रिल आणि 6, 12, 19 मे