कट्टरतेवर उतरली भाजपा, तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात होतील दंगली; अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2019 12:51 PM2019-01-30T12:51:21+5:302019-01-30T12:57:48+5:30

भारतात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे.

lok sabha election in india american intelligence report bjp communal violence modi government | कट्टरतेवर उतरली भाजपा, तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात होतील दंगली; अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा दावा

कट्टरतेवर उतरली भाजपा, तर लोकसभा निवडणुकीपूर्वीच देशात होतील दंगली; अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा दावा

Next
ठळक मुद्देभाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास देशात दंगली घडतील... अमेरिकी सिनेटच्या निवड समितीसमोर हा अहवाल ठेवण्यात आला आहे.मोदींच्या कार्यकाळात भाजपाशासित राज्यांमध्ये सांप्रदायिक वाद विकोपाला केला आहे.

नवी दिल्ली- भारतात लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. लोकसभा निवडणुकीलाही काही महिनेच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे पूर्ण जगाचं लक्ष भारतातल्या लोकसभा निवडणुकांवर राहणार आहे. अशात अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं एक खळबळजनक दावा केला आहे. भाजपा लोकसभा निवडणुकीपूर्वी कट्टरतेवर उतरल्यास देशात दंगली घडतील, असा दावा अमेरिकन गुप्तचर यंत्रणा असलेल्या सीआयएनं केला आहे.

अमेरिकी सिनेटला सोपवण्यात आलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. भाजपानं निवडणुकीपूर्वी हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर जोर दिल्यास देशात सांप्रदायिक दंगली भडकतील, असा दावा या अहवालात करण्यात आला आहे. रिपोर्टनुसार, अमेरिकी सिनेटच्या निवड समितीसमोर हा अहवाल ठेवण्यात आला आहे. जो सीआयए या गुप्तचर विभागाचे संचालक डेन कोट्स यांनी तयार केला आहे. 

रिपोर्टमध्ये लिहिलं आहे की, जर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील भाजपा हिंदू राष्ट्राच्या मुद्द्यावर पुढे गेल्यास भारतात होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीपूर्वीच दंगली होतील. अमेरिका प्रत्येक वर्षाच्या सुरुवातीला हा अहवाल प्रसिद्ध करते. ज्यात देशभरातील घटनांचं मूल्यांकन केलेलं असतं. 

कोट्स म्हणाले, मोदींच्या कार्यकाळात भाजपाशासित राज्यांमध्ये सांप्रदायिक वाद विकोपाला केला आहे. भाजपा सरकार असलेल्या काही राज्यांमध्ये हिंदुत्ववादी नेत्यांनी हिंदू राष्ट्रवादाच्या मुद्द्यावर जोर देत हिंसाचार केला आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अशा प्रकारचा हिंसाचार झाल्यास दहशतवादी संघटनांना दृष्कृत्य करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे, असा दावाही या अहवालात करण्यात आला आहे.  

Web Title: lok sabha election in india american intelligence report bjp communal violence modi government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.