Lok Sabha Election Result 2024 : सासरे, सुना एकमेकांविरुद्ध लढले, हाती आला भाेपळा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 10:08 AM2024-06-06T10:08:39+5:302024-06-06T10:09:23+5:30

Lok Sabha Election Result 2024: चाैटाल कुटुंबीयातील मतभेद बरेच चर्चेत हाेते. भाजपने रणजित चाैटाला यांना उमेदवारी दिली हाेती

Lok Sabha Election Result 2024: Father-in-law, daughter-in-law fought against each other, chautala family war among ranjit singh chautala vs naina vs sunaina chautala | Lok Sabha Election Result 2024 : सासरे, सुना एकमेकांविरुद्ध लढले, हाती आला भाेपळा

Lok Sabha Election Result 2024 : सासरे, सुना एकमेकांविरुद्ध लढले, हाती आला भाेपळा

हिसार : नातेवाइकांमध्येच झालेल्या आणखी एका निवडणुकीची चर्चा रंगली हाेती. ही जागा हाेती हरयाणातील हिसारची. येथे 
चाैटाला कुटुंबीय एकमेकांविराेधात लढले. एवढे सगळे लढूनही एकाचाही विजय झाला नाही. येथे दाेन सुना आणि चुलत सासरे रिंगणात हाेते.

चाैटाल कुटुंबीयातील मतभेद बरेच चर्चेत हाेते. भाजपने रणजित चाैटाला यांना उमेदवारी दिली हाेती. त्यांच्याविराेधात जजपाच्या आमदार नयना चाैटाला आणि आयएनएलडी पक्षाच्या सुनयना चाैटाला निवडणुकीच्या रिंगणात हाेत्या. रणजित चाैटाला हे दाेघींचे चुलत सासरे लागतात. या लढतीत तिघांपैकी काेणाचाही विजय झाला नाही. काँग्रेसचे जय प्रकाश हे येथून विजयी झाले.

रणजीत चाैटाला यांना ५ लाखांपेक्षा जास्त मते मिळाली. तर नयना आणि सुनयना यांना प्रत्येकी जेमते २२ हजारांवर मते मिळाली. सुनयना यांचे पती पक्षाचे नेते अभयसिंह चाैटाला यांचाही कुरुक्षेत्र येथून पराभव झाला. येथे भाजपचे नवीन जिंदाल विजयी झाले. अभयसिंह यांना ७८,७०८ मते मिळाली.

Web Title: Lok Sabha Election Result 2024: Father-in-law, daughter-in-law fought against each other, chautala family war among ranjit singh chautala vs naina vs sunaina chautala

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.