Lok Sabha Election Result 2024 : नितीशकुमार झाले अधिक ताकदवान, १२ जागा ताब्यात घेण्यात यश

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 12:38 PM2024-06-05T12:38:49+5:302024-06-05T12:39:13+5:30

Lok Sabha Election Result 2024 : झारखंड आणि बिहारमधील जागा कमी झाल्याचा फटका एनडीएला बसला आहे.

Lok Sabha Election Result 2024 : Nitish Kumar became more powerful, succeeded in capturing 12 seats | Lok Sabha Election Result 2024 : नितीशकुमार झाले अधिक ताकदवान, १२ जागा ताब्यात घेण्यात यश

Lok Sabha Election Result 2024 : नितीशकुमार झाले अधिक ताकदवान, १२ जागा ताब्यात घेण्यात यश

- एस.पी. सिन्हा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीतील बिहार आणि झारखंडचे निकाल धक्कादायक ठरले आहेत. झारखंडमध्ये माजी मुख्यमंत्री सोरेन यांच्यावरील कारवाई जनतेला पटलेली नसल्याचे दिसून आले. तर बिहारमध्ये नितीशकुमार सोबतीला असल्याने भाजपची कामगिरी चांगली झाली आहे. राज्यातील १६ जागांवर निवडणूक लढवणाऱ्या जदयूने १२ जागा ताब्यात घेण्यात यश मिळविले तर १७ जागांवर निवडणूक लढविणाऱ्या भाजपला १२ जागा मिळाल्या आहेत. झारखंड आणि बिहारमधील जागा कमी झाल्याचा फटका एनडीएला बसला आहे.

२०१९ च्या निवडणुकीत एनडीएने बिहारमध्ये ४० पैकी ३९ जागा जिंकल्या होत्या. तर झारखंडमध्ये एनडीएला १४ पैकी १२ जागा मिळाल्या. बिहारमध्ये एनडीएला ६ जागांवर फटका बसला आहे. चिराग पासवान यांचा पक्ष आपल्या कोट्यातील पाचही जागांवर आपली मजबूत पकड दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. तेजस्वी यादव यांनी संपूर्ण निवडणूक प्रचारादरम्यान बिहारमध्ये २५१ सभा घेतल्या, मात्र आता त्यांची जादू चालली नसल्याचे दिसून येत आहे. आपला पक्ष आपल्या आई-वडिलांचा आहे, असे तेजस्वी यादव निवडणुकीच्या काळात सांगत राहिले. पण आता जनतेने पुन्हा एकदा नितीश आणि मोदींवर विश्वास व्यक्त केल्याचे दिसते.

पक्षबदलूंना दणका
झारखंडमध्ये निवडणुकीपूर्वी पक्ष बदलून निवडणूक लढवणाऱ्या बहुसंख्य नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. बिहारमधील जनतेने नितीशकुमार यांच्या नावावर मतदान केले.
या निवडणुकीत मोठ्या आशा असलेल्या राजदला अपेक्षेप्रमाणे यश मिळाले नाही.
बिहार आणि झारखंडमध्ये भाजपला अपेक्षेपेक्षा जास्त लढत द्यावी लागली. बिहारबाबत सर्वच निवडणूक पंडितांचे भाकीत फोल ठरले. 

सर्व अंदाज चुकले
पलटी मारल्याने त्यांचा पक्ष कमकुवत होईल असे जे बोलत होते त्यांचे सर्व अंदाच चुकले आहेत. अशा स्थितीत अवघ्या काही महिन्यांपूर्वी एनडीएमध्ये दाखल झालेले नितीशकुमार हे राजकारणातील निष्णात खेळाडू आहेत, असे म्हटले जात आहे. स्वत:च्या पक्षाची कामगिरी सुधारण्याबरोबरच ते या निवडणुकीत भाजपसाठी संजीवनीही ठरत आहेत. निकालांवर नजर टाकली, तर पुन्हा एकदा नितीशकुमार अतिशय ताकदवान बनले आहेत.

Web Title: Lok Sabha Election Result 2024 : Nitish Kumar became more powerful, succeeded in capturing 12 seats

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.