Lok Sabha Election Result 2024 : केवळ 0.7 टक्के मते कमी पडली आणि भाजपच्या खात्यातून 63 जागा वजा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2024 09:14 AM2024-06-08T09:14:25+5:302024-06-08T09:14:47+5:30

Lok Sabha Election Result 2024 : १.७३ टक्के मतांच्या फरकाने काँग्रेसला मिळाल्या दुप्पट जागा

Lok Sabha Election Result 2024 : Only 0.7 percent votes lost and 63 seats deducted from BJP's account | Lok Sabha Election Result 2024 : केवळ 0.7 टक्के मते कमी पडली आणि भाजपच्या खात्यातून 63 जागा वजा

Lok Sabha Election Result 2024 : केवळ 0.7 टक्के मते कमी पडली आणि भाजपच्या खात्यातून 63 जागा वजा

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीत भाजपला स्वबळावर बहुमत मिळालेले नाही. त्यामागची मतांची आकडेवारी आता समोर येत आहे. निवडणुकीतील मतमोजणीच्या अंतिम आकडेवारीनुसार, केवळ ०.७ टक्के लोकप्रिय मतांची टक्केवारी घटल्याने भाजपचा ६३ जागांवर पराभव झाला. यामुळे भाजपला २७२ हा जादुई आकडा गाठता आला नाही. भाजपने २०१४ मधील २८२ जागांवरील कामगिरी सुधारत २०१९च्या निवडणुकीत ३०३ जागा जिंकल्या होत्या.

दुसरीकडे काँग्रेसच्या मतांची टक्केवारी केवळ १.७ टक्के वाढल्याने २०१९च्या तुलनेत दुप्पट म्हणजेच ९९ जागा मिळाल्या आहेत. हाच फॉर्म्युला वापरून बिहारमध्ये चिराग पासवान यांच्या एलजेपी-आरव्हीने केवळ ०.४४ टक्के मतांच्या टक्केवारीसह ५ जागा ताब्यात घेतल्या आहेत. मात्र बसपाने २.०४ टक्के मते मिळवूनही एकही जागा जिंकू शकली नाही.

काँग्रेसची कामगिरी सुधारली
भाजपशी थेट मुकाबला करत काँग्रेसने २०१४ आणि २०१९ च्या तुलनेत २०१४च्या लोकसभा निवडणुकीत उत्तम कामगिरी केली आहे.
२०१९ मध्ये भाजपच्या तुलनेत केवळ ७.९ टक्के जागा जिंकणाऱ्या काँग्रेसने २०२४च्या तुलनेत २८.९ टक्के जागांवर विजय मिळविला आहे.
मात्र काँग्रेस अद्यापही २००९ च्या निवडणूक स्तरावर पोहोचलेली नाही. तेव्हा काँग्रेसने भाजपमध्ये अधिक मते मिळविली होती.
२००९ मध्ये भाजपशी थेट लढत असलेल्या १७३ जागांपैकी काँग्रेसने ९३ आणि भाजपने ८० जागा जिंकल्या होत्या.

लोकसभा निवडणूक २०१९ 
    मतांची टक्केवारी    जागा

भाजप    ३७.३०%    ३०३ 
काँग्रेस    १९.४६%    ५२ 
लोकसभा निवडणूक २०२४ 
    मतांची टक्केवारी    जागा    अंतर
भाजप    ३६.५६%    २४०    -०.७%            (६३ जागा कमी)
काँग्रेस    २१.१९    ९९      १.७३%            (४७ जागांत वाढ)

यावेळी इतर प्रमुख पक्षांना मिळालेली मतांची टक्केवारी

    सपा    ४.५८%
    टीएमसी    ४.३७%
    डीएमके    १.८२%
    जदयू    १.२५
    टीडीपी    १.९८%
    उद्धवसेना    १.४८%
    शिंदेसेना    १.१५%
    आप    १.११%
    शरद पवार गट    ०.९२%
    एलजेपी-आरव्ही    ०.४४%

Web Title: Lok Sabha Election Result 2024 : Only 0.7 percent votes lost and 63 seats deducted from BJP's account

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.