Lok Sabha Election Result 2024 : बहुमताचा आकडा हुकला अन् मित्रांचे चेहरे खुलले; आघाडीचे सरकार चालविण्याची मोठी कसरत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 10:49 AM2024-06-06T10:49:35+5:302024-06-06T10:51:02+5:30

Lok Sabha Election Result 2024 : आघाडी सरकारची संस्कृती त्यांना मानवणारी नाही. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारमध्ये कोणताही मित्रपक्ष भाजपवर आपल्या अटी लादू शकलेला नाही. 

Lok Sabha Election Result 2024 : The majority number was lost and the faces of friends were revealed; A major exercise in running a coalition government | Lok Sabha Election Result 2024 : बहुमताचा आकडा हुकला अन् मित्रांचे चेहरे खुलले; आघाडीचे सरकार चालविण्याची मोठी कसरत

Lok Sabha Election Result 2024 : बहुमताचा आकडा हुकला अन् मित्रांचे चेहरे खुलले; आघाडीचे सरकार चालविण्याची मोठी कसरत

- हरीश गुप्ता

नवी दिल्ली : १८व्या लोकसभेत भाजपला बहुमताचा २७२चा आकडा गाठता न आल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आघाडीचे सरकार चालविताना मोठी कसरत होणार आहे. मोदींच्या गेल्या २३ वर्षांच्या कारकिर्दीचा (गुजरातमध्ये १३ वर्षे आणि दिल्लीत १० वर्षे) ‘ट्रॅक रेकॉर्ड’ पाहिल्यास, त्यांनी नेहमीच मोठा जनादेश मिळवून एकहाती सत्ता राबवली आहे. आघाडी सरकारची संस्कृती त्यांना मानवणारी नाही. गेल्या दहा वर्षांत मोदी सरकारमध्ये कोणताही मित्रपक्ष भाजपवर आपल्या अटी लादू शकलेला नाही. 

परंतु, जनादेश न मिळणे हा आता भाजपसाठी चिंतेचा विषय आहे. कारण त्याचे अनेक विश्वासू सहकारी वेगळे झाले आहेत, तर त्यातील काहींना परत रालोआत सामावून घेण्यात आले आहे. उदाहरणार्थ, जनता दल (यू)चे प्रमुख व बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार. नितीश कुमार मोदींच्या नेतृत्त्वाखालील रालोआतून दोनदा बाहेर पडले व पुन्हा रालोआत परतले. आता नितीश कुमार यांच्याकडे आनंदाचे कारण असेल. राज्यात विधानसभा निवडणुका लवकर घ्याव्यात, असे त्यांनी भाजपला आधीच सांगितले आहे. 

आम्ही म्हणू ती पूर्वदिशा धोरणाने गळचेपी
निवडणूक लवकर घेणे भाजपच्या पचनी पडणारे नाही. तसेच चंद्राबाबू नायडू यांना सध्याच्या भाजप सरकारचा अनुभव चांगला नाही. जगनमोहन रेड्डी यांच्याशी ते एकाकी झुंजत होते, तसेच ते तुरुंगातही गेले होते. तेव्हा भाजप नेतृत्त्वाने त्यांना कोणतीही मदत केली नाही. 
काही प्रादेशिक पक्ष फुटले. हे कथितरीत्या भाजपच्या आशीर्वादाने घडले. आम्ही म्हणू ती पूर्वदिशा असे धोरण सत्ताधारी पक्षाने ठेवल्याने अनेक छोट्या पक्षांची गळचेपी झाली होती. भाजपचा बहुमताचा आकडा हुकल्याने ते गालातल्या गालात हसत असून, आता आपल्या आवाजाला धार येईल, अशी आशा बाळगून आहेत.

Web Title: Lok Sabha Election Result 2024 : The majority number was lost and the faces of friends were revealed; A major exercise in running a coalition government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.