"पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींपेक्षा जास्त चांगला पर्याय असू शकत नाही’’, बिहारमधील बड्या नेत्याचा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 03:53 PM2024-06-06T15:53:32+5:302024-06-06T16:02:41+5:30

Lok Sabha Election Result 2024: बिहारमधील पूर्णिया मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत विजयी झालेले पप्पू यादव यांनीही एक मोठा दावा केला आहे. जर केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असेल तर पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरी यांच्यापेक्षा चांगला पर्याय समोर असू शकत नाही. 

Lok Sabha Election Result 2024: "There can't be a better choice for PM than Nitin Gadkari", claims a senior leader from Bihar  | "पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींपेक्षा जास्त चांगला पर्याय असू शकत नाही’’, बिहारमधील बड्या नेत्याचा दावा 

"पंतप्रधानपदासाठी नितीन गडकरींपेक्षा जास्त चांगला पर्याय असू शकत नाही’’, बिहारमधील बड्या नेत्याचा दावा 

लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपाचं बहुमत हुकल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मित्रपक्षांच्या साथीने सरकार स्थापन करण्यासाठी हालचाली कराव्या लागत आहेत. एकीकडे सरकार स्थापन करण्यासाठी भाजपा आणि एनडीएतील मित्रपक्षांनी सरकार स्थापन करण्यासाठी एक पाऊल पुढं टाकलेलं असतानाही, इंडिया आघाडीतील नेत्यांकडून वेगवेगळे दावे करण्यात येत आहे. बिहारमधील पूर्णिया मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवत विजयी झालेले पप्पू यादव यांनीही एक मोठा दावा केला आहे. जर केंद्रात एनडीएचं सरकार स्थापन होणार असेल तर पंतप्रधानपदासाठीनितीन गडकरी यांच्यापेक्षा चांगला पर्याय समोर असू शकत नाही. 

ते पुढे म्हणाले की, पूर्णियामधून पप्पू यादव विजयी होऊ नये, असं संपूर्ण माफिया सिस्टिमला वाटत होते. मात्र पूर्णियामधील जनतेमध्ये राहायचं आणि त्यांच्याशी असलेलं नातं पार पाडायचं, हे माझं लक्ष्य होतं. दरम्यान, आरजेडीबाबत असलेल्या मतभेदांबाबत त्यांनी सांगितलं की, बिहारमध्ये काँग्रेसला उत्तर प्रदेशसारखा सन्मान मिळाला नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसने १७ जागांवर निवडणूक लढवली आणि अखिलेश यादव यांच्यासोबत एका कौटुंबिक नात्यासारखं काम झालं. विशेषत: प्रियंका गांधी यांनी खूप मेहनत घेतली. मात्र बिहारमध्ये राहुल गांधी यांनी केवळ ९ जागा घेत सारं काही दिलं, असेही पप्पू यादव म्हणाले. 

दरम्यान, पप्पू यादव यांनी बिहारमधील पूर्णिया लोकसभा मतदारसंघातून जेडीयूचे उमेदवार संतोष कुशवाहा यांना सुमारे १६ हजार मतांनी पराभूत केले. दरम्यान, आरजेडीकडून बाजूल टाकण्यात आल्याच्या आरोपांबाबत पप्पू यादव म्हणाले की, पप्पू पप्पू यादवला साक्षात देवही बाजूला करू शकत नाही. तसंच लालूप्रसाद यादव हे माझ्यासाठी पित्यासारखे आहेत, असा दावाही त्यांनी केला.  

Web Title: Lok Sabha Election Result 2024: "There can't be a better choice for PM than Nitin Gadkari", claims a senior leader from Bihar 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.