Lok Sabha Election Result 2024 : बारामुल्लात उमर अब्दुल्लांचा दारुण पराभव, कोण आहे हरवणारा राशीद शेख? टेरर फंडींगमध्ये भोगतोय शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 05:35 PM2024-06-04T17:35:07+5:302024-06-04T17:36:30+5:30

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल धक्कादायक आहेत. यूपीसह अनेक राज्यांमध्ये भाजपप्रणित एनडीएला मोठा झटका बसला आहे. तर दुसरीकडे जम्मू-काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना आपल्या जागा गमवाव्या लागल्यात.

Lok Sabha Election Result 2024 Umar Abdullah s heavy defeat in Baramulla Rashid Shaikh won Punishment for terror funding details | Lok Sabha Election Result 2024 : बारामुल्लात उमर अब्दुल्लांचा दारुण पराभव, कोण आहे हरवणारा राशीद शेख? टेरर फंडींगमध्ये भोगतोय शिक्षा

Lok Sabha Election Result 2024 : बारामुल्लात उमर अब्दुल्लांचा दारुण पराभव, कोण आहे हरवणारा राशीद शेख? टेरर फंडींगमध्ये भोगतोय शिक्षा

Lok Sabha Election Result 2024 : लोकसभा निवडणूक २०२४ चे निकाल धक्कादायक आहेत. यूपीसह अनेक राज्यांमध्ये भाजपप्रणित एनडीएला मोठा झटका बसला आहे. जम्मू-काश्मीरमध्ये माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती यांना आपल्या जागा गमवाव्या लागल्यात. उमर अब्दुल्ला बारामुल्लामध्ये तर मेहबूबा मुफ्ती अनंतनागमध्ये पराभूत झाल्या. दरम्यान, निवडणूक आयोगाकडून अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. उमर अब्दुल्ला यांना पाडणारा अब्दुल राशीद शेख आहे. शेख यानं अपक्ष म्हणून निवडणूक लढवली. परंतु सध्या तो टेरर फंडिंग प्रकरणात तिहार तुरुंगात आहे.
 

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, जम्मू-काश्मीरच्या दोन्ही माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला आणि मेहबूबा मुफ्ती आपापल्या लोकसभा मतदारसंघात पराभव जवळपास निश्चित आहे. बारामुल्ला मतदारसंघात अब्दुल्ला दोन लाख मतांनी पिछाडीवर होते, तर अनंतनाग-राजौरी मतदारसंघातून मेहबूबा मुफ्ती अडीच लाख मतांनी पिछाडीवर होत्या. बारामुल्ला लोकसभा मतदारसंघात साजिद लोन हे जम्मू-काश्मीर पीपल्स कॉन्फरन्स पक्षाचे उमेदवार आहेत. माध्यमांशी बोलताना बोलताना ओमर यांनी आपला पराभव मान्य केला आहे.
 

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते मियां अल्ताफ अहमद यांनी निवडणुकीत मेहबूबा मुफ्ती यांचा पराभव केला. अहमद आणि मुफ्ती यांच्यात अडीच लाखांचा फरक आहे.


कोण आहे अब्दुल राशीद शेख?
 

अब्दुल राशीद ऊर्फ इंजिनिअर राशीद सध्या टेरर फंडिंग प्रकरणात तिहार तुरुंगात आहे. राशीद यापूर्वी २ वेळा आमदारही होता. राशीदला एनआयएनं २०१९ मध्ये टेरर फंडिंग प्रकरणात अटक केली होती. त्याची दोन मुलं अबरार राशीद आणि असरार राशीद यांनी त्याच्यावतीने प्रचार केला होता. राशीदनं २००८ आणि २०१४ मध्ये लांगेट विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला होता. मात्र २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत त्याला पराभवाला सामोरं जावं लागलं होतं.

Web Title: Lok Sabha Election Result 2024 Umar Abdullah s heavy defeat in Baramulla Rashid Shaikh won Punishment for terror funding details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.