"मस्तवाल सत्ताधाऱ्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिलं’’ उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
By ऑनलाइन लोकमत | Published: June 4, 2024 08:30 PM2024-06-04T20:30:06+5:302024-06-04T20:32:11+5:30
Lok Sabha Election Result 2024: आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाला (BJP) बहुमत मिळणार नाही हे निश्चित झालेले आहे. दर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या (Uddhav Thackeray) नेतृत्वाखालील ठाकरे गटाला बऱ्यापैकी यश आले आहे.
आज जाहीर झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपाला मोठा धक्का बसला आहे. आतापर्यंतच्या कलांमधून भाजपाला बहुमत मिळणार नाही हे निश्चित झालेले आहे. दर दुसरीकडे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील ठाकरे गटाला बऱ्यापैकी यश आले आहे. त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील महाविकास आघाडी आणि देशात इंडिया आघाडीला मिळालेल्या यशानंतर उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. तसेच सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिले, अशा शब्दात उत्स्फूर्त प्रतिक्रिया दिली आहे.
शिवसेना ठाकरे गट आणि महाविकास आघाडीला मिळालेल्या बंपर यशानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आजच्या निकालाबाबत माझी पहिली प्रतिक्रिया अशी आहे की, सर्वसामान्य माणसाने आपल्या देशामध्ये सर्वसामान्य माणसाची ताकद काय असते हे दाखवून दिलेलं आहे. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना एका बोटाने हरवू शकतो, हे मतदारांनी दाखवून दिले आहे, त्यासाठी मी सर्वसामान्य मतदारांचं अभिनंदन करतो. सत्ताधारी कितीही मस्तवाल झाले तरी त्यांना एका बोटाने हरवू शकतो, हेच मतदारांनी लोकांना दाखवून दिले आहे, असं विधान उद्धव ठाकरे यांनी केलं आहे.
दरम्यान, आज झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याचं दिसत आहे. आतापर्यंत समोर आलेल्या कलांमध्ये महाराष्ट्रातील ४८ जागांपैकी २९ जागांवर महाविकास आघाडीने आघाडी घेतली आहे. तर महायुती १८ जागांवर आघाडीवर आहे. तर शिवसेना ठाकरे गटाने ९ जागा जिंकून आपला जनाधार कायम असल्याचे दिसून आले आहे.