"नरेंद्र मोदींना शपथ घेऊ द्या मग खेळ सुरु होईल"; संजय राऊतांचे सूचक विधान

By ऑनलाइन लोकमत | Published: June 5, 2024 07:31 PM2024-06-05T19:31:18+5:302024-06-05T19:33:28+5:30

Sanjay Raut on Narendra Modi : नरेंद्र मोदी लवकरच सत्ता स्थापन करणार असल्याचा दावा सुरु असताना संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे.

Lok Sabha Election Result Sanjay Raut big statement on Narendra Modi claim to power | "नरेंद्र मोदींना शपथ घेऊ द्या मग खेळ सुरु होईल"; संजय राऊतांचे सूचक विधान

"नरेंद्र मोदींना शपथ घेऊ द्या मग खेळ सुरु होईल"; संजय राऊतांचे सूचक विधान

Lok Sabha Election Result : लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळाले असून ते तिसऱ्यांदा सत्तेवर येणार आहेत. नव्या सरकारच्या शपथविधीची तारीख आणि वेळही निश्चित करण्यात आली आहे. ८ जून रोजी संध्याकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी सोहळा होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांनी समर्थनाचे पत्र दिल्यानंतर मोदी आता राष्ट्रपतींकडे सत्ता स्थापनेचा दावा करणार आहे. दुसरीकडे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी  मोदींना शपथ घेऊ द्या मग खेळ सुरु होईल, असे सूचक विधान केलं आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर एनडीएकडून सत्तास्थापनेचा दावा करण्याची तयारी सुरु झाली आहे. भाजपने मित्रपक्षांसोबत बैठक घेऊन सत्तास्थापनेसंदर्भात चर्चा सुरु केली आहे. एनडीएची बैठक संपली असून ते सत्तास्थापनेचा दावा करणार आहेत. अशातच ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठे विधान केले आहे.

"आम्ही सत्तेचे भुकेले नाहीत. भाजप मोठा पक्ष आहे. त्यांचा सत्ता स्थापन करण्याचा पहिला अधिकार आहे. राष्ट्रपती, बहुमत घरचे आहे. आता राष्ट्रपती भवनात जातील आणि दावा करतील. मोदींना शपथ घेऊ द्या मग खेळ सुरु होईल. हे सरकार चालणार नाही. आम्हाला तर मोदींनी लवकरात लवकर शपथ घ्यावी असे वाटते. त्यांच्यातर्फे आम्ही मिठाई वाटू. नितीश कुमार आणि चंद्राबाबू यांनी त्यांच्यासोबत निवडणुका लढल्याने त्यांना समर्थन पत्र द्यावं लागेल. चंद्राबाबू आणि नितीश बाबू यांना देश ओळखतो. ते काय फक्त भाजपचे नाहीत, सगळ्या पक्षाचे आहेत. पण मोदींनी युती सरकार चालवण्याचा किती अनुभव आहे. मोदींनी तिसऱ्यांदा शपथ घेण्याचा विक्रम घेऊ द्या मग पाहू," असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

फडणवीसांकरवी योगींचा बळी देण्याचा प्रयत्न - संजय राऊत

"आमच्याकडे वाकड्या नजरेने बघण्यांना धडा राज्याच्या जनतेने दिला. महाराष्ट्राच्या राजकारणात विष पेरण्याचे काम, राजकारणातील सभ्यता, संस्कार संपवून आनंदीबाईंचे राजकारण आणण्याचे प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला. राज्याच्या जनतेने त्यांना नेतृत्व करण्याची संधी दिली होती.  पण त्यांनी कपट, कारस्थानं यातच वेळ घालवला आणि त्याचा हा परिणाम आहे. शेवटी नियती आहे. आज तुम्ही २३ वरुन नऊवर आलात. विधानसभेला जनता तुम्हाला कायमची खेचेन. महाविकास आघाडी १८५ जागा जिंकेल. त्याचे नेते नरेंद्र मोदी आहेत. त्यामुळे अशाप्रकारच्या गमतीजमती करत असतात. त्यांचे चेले देवेंद्र फडणवीस आहेत. फडणवीसांच्या खांद्यावर बंदुक ठेवून हा योगी आदित्यनाथ यांचा बळी घेण्याचा प्रयत्न आहे," असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 

Web Title: Lok Sabha Election Result Sanjay Raut big statement on Narendra Modi claim to power

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.