'राफेलमधल्या दलालीच्या पैशातून मोदी आमदार विकत घेतायत'
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2019 13:31 IST2019-05-06T13:30:57+5:302019-05-06T13:31:11+5:30
लोकसभा निवडणूक 2019च्या पाचव्या टप्प्याचं मतदान सुरू आहे.

'राफेलमधल्या दलालीच्या पैशातून मोदी आमदार विकत घेतायत'
नवी दिल्लीः लोकसभा निवडणूक 2019च्या पाचव्या टप्प्याचं मतदान सुरू आहे. त्याचदरम्यान सहाव्या आणि सातव्या टप्प्यासाठी राजकीय नेत्यांचा प्रचार सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आजच्या प. बंगाल आणि झारखंडमध्ये निवडणूक प्रचारानं रंगत आणली आहे. अरविंद केजरीवाल यांनीही प्रचारादरम्यान मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. नोटाबंदी हा देशातील स्वातंत्र्यानंतरचा सर्वात मोठा घोटाळा आहे. जर व्यापाऱ्यांनी भाजपाला मतदान केलं तर सीलिंग सुरूच राहणार आहे. पण 'आप'ला मतदान केल्यास सीलिंग थांबू शकतं, असंही केजरीवाल म्हणाले आहेत. मोदींनी राफेलमधून बक्कळ पैसा कमावला, त्याच पैशानं आता मोदी आमदार विकत घेत आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोदींवर गंभीर आरोप केले आहेत. आज देशात टॅक्स टेररिज्म पसरला आहे. त्यामुळे देशात भीती आहे. मोदी सांगतायत की, दहशतवाद्यांना आम्ही घरात घुसून मारलं, पण पाकिस्तानवाल्यांना पुन्हा मोदीच पंतप्रधान व्हावेत, असं वाटतंय. मोदींचे पाकिस्तानबरोबर गहन संबंध आहेत. मग ते राष्ट्रवादी कसे ठरतील, असंही केजरीवाल म्हणाले आहेत.
तर दिल्लीत आपला पुन्हा एकदा धक्का बसण्याची शक्यता आहे. बिजवासनमधून आपचे आमदार असलेले देवेंद्र सिंह सहरावत भाजपाचा गोटात सामील होण्याची शक्यता आहे. तत्पूर्वी अरविंद वाजपेयी भाजपामध्ये सामील झाले आहेत.