रालोआ मोदींच्या नेतृत्वाखाली लढणार 2019 ची लोकसभा निवडणूक
By admin | Published: April 10, 2017 10:14 PM2017-04-10T22:14:24+5:302017-04-10T22:25:18+5:30
2019च्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मोठा निर्णय घेतला आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - 2019च्या सार्वत्रिक निवडणुकीबाबत राष्ट्रीय लोकशाही आघाडीने मोठा निर्णय घेतला आहे. 2019 साली होणारी लोकसभा निवडणूक पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय रालोआने घेतला आहे. आज राजधानीतील प्रवारसी भारतीय केंद्रात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी रालोआचे सुमारे 33 घटकपक्ष उपस्थित होते. विशेष बाब म्हणजे मोदींच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रस्तावाला शिवसेनेने पाठिंबा दिला आहे.
भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज झालेल्या रालोआच्या घटक पक्षांच्या बैठकीतील माहिती प्रसारमाध्यमांना दिली. त्यावेळी 2019 साली होणाऱ्या लोकसभा निवडणुका पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली लढण्याचा निर्णय रालोआने घेतला असल्याचे जेटलींनी सांगितले. दरम्यान, गेल्या काही काळापासून भाजपा आणि शिवसेनेतील ताणलेल्या संबंधांच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत शिवसेनेची काय भूमिका असेल, याची चर्चा राजकीय वर्तुळात होती. पण शिवसेनेही आपला मोदी विरोध काहीसा मवाळ करत मोदींच्या नेतृत्वाखाली आगामी लोकसभा निवडणूक लढवण्याच्या प्रस्तावास समर्थन दिले.
राजधानी दिल्लीमध्ये आज रालोआच्या घटक पक्षांची बैठक झाली. या बैठकीला रालोआच्या 33 घटक पक्षांनी उपस्थिती लावली. उत्तर प्रदेशात मिळवलेल्या विजयाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली होती. दिल्लीतल्या प्रवासी भारतीय भवनमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील उपस्थित होते.
NDA members in the meeting passed a resolution: will work together to succeed in 2019 under the leadership of PM Modi pic.twitter.com/VQyauxtMOc
— ANI (@ANI_news) April 10, 2017