Lok Sabha Elections 2019: गळ्यात नोटांचा हार घालून नवरदेव पोहचला मतदानाला!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2019 02:12 PM2019-05-19T14:12:51+5:302019-05-19T14:13:39+5:30

लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकजण मतदानाचा अधिकार बजावत असतो, मात्र यातील काही मतदार असे असतात ज्यांनी मतदान करणे चर्चेचा विषय बनतो.

Lok Sabha Elections 2019: A bridegroom along with his family casts his vote | Lok Sabha Elections 2019: गळ्यात नोटांचा हार घालून नवरदेव पोहचला मतदानाला!

Lok Sabha Elections 2019: गळ्यात नोटांचा हार घालून नवरदेव पोहचला मतदानाला!

Next

मनाली - लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान आज पार पडत आहेत. देशातील लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदारराजा मतदान करुन आपलं कर्तव्य निभावत आहे. अशातच हिमाचल प्रदेशातील या मतदाराची चर्चा सोशल मिडीयावर झाली. मनाली लोकसभा मतदारसंघासाठी मतदान केंद्रावर लग्नाआधी नवरदेव मतदानासाठी पोहचला. तेव्हा नवरदेवाचा वेश पाहून उपस्थित मतदार आणि मतदान केंद्रावरील अधिकारी आश्चर्यचकीत झाले. 


तर दुसरीकडे पश्चिम बंगालमधील डमडम लोकसभा मतदारसंघासाठी एका मुलाने आपल्या 80 वर्षीय आईला उचलून मतदान केंद्रावर आणलं. त्यानंतर या आईने आपला मतदानाचा हक्क बजावला. 


तामिळनाडूमध्ये 103 वर्षीय वृद्ध महिलेने हातात काठी घेत सुलुर लोकसभा जागेवर मतदान केंद्रावर येऊन मतदान केले. 


मध्य प्रदेशमध्ये दिव्यांग महिला सोनू माळी इंदूर लोकसभा मतदारसंघासाठी नंदा नगर मतदान केंद्रावर जाऊन मतदान केलं. 


Web Title: Lok Sabha Elections 2019: A bridegroom along with his family casts his vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.