'भाजपला आंध्रप्रदेश, तामिळनाडूत भोपळा, तर महाराष्ट्रात २० जागा'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:45 PM2019-05-18T12:45:41+5:302019-05-18T12:47:02+5:30

पैशांच्या जोरावर भाजपकडून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भाजपला गुंडा पार्टी असल्याचे सांगत, भाजपकडून ३०० जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचे ममता म्हणाल्या.

Lok sabha elections 2019 mamta banerjee exit poll for bjp | 'भाजपला आंध्रप्रदेश, तामिळनाडूत भोपळा, तर महाराष्ट्रात २० जागा'

'भाजपला आंध्रप्रदेश, तामिळनाडूत भोपळा, तर महाराष्ट्रात २० जागा'

Next

नवी दिल्ली - भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्या रोड शोमध्ये हिंसा झाल्यापासून शाह आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यातील संघर्ष कायम आहे. त्यात ममता यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपला किती जागा मिळणार याचे भाकीत केले. भाजपला यावेळी १०० चा आकडा पार करणे देखील जड जाईल, असं ममता यांनी सांगितले.

पैशांच्या जोरावर भाजपकडून मतं खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. भाजपला गुंडा पार्टी असल्याचे सांगत, भाजपकडून ३०० जागा जिंकण्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र परिस्थिती वेगळीच असल्याचे ममता म्हणाल्या. त्यांच्यामते भाजपला आंध्रप्रदेश आणि तामिळनाडूमध्ये भोपळाही फोडता येणार नाही. तर महाराष्ट्रात २० जागा मिळविण्यात भाजपला यश येईल. या निवडणुकीत भाजपला २०० जागांचे नुकसान होईल, असं भाकीत ही ममता यांनी केले.

दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याकडून लोकसभेत भाजपला ३०० हून अधिक जागा मिळेल असा दावा करण्यात आला आहे. तर २०१४ पेक्षा मोठी लाट यावेळी असल्याचं देखील मोदींनी सांगितले आहे. आता कुणाचा दावा खरा ठरणार हे येत्या २३ मे रोजीच कळणार आहे.

याआधी पश्चिम बंगालमध्ये अमित शाह यांच्या रोड शोमध्ये झालेल्या हिंसेनंतर निवडणूक आयोगाने निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवसाच्या २० तासांआधीच प्रचार थांबविण्याचे आदेश दिले आहेत. यावरून ममता यांनी निवडणूक आयोगावर टीका केली. या घटनेनंतर ममता यांना विरोधकांनी देखील पाठिंबा दर्शविला आहे. निवडणूक आयोग दबावात येऊन काम करत असल्याचे ममता यांनी म्हटले होते.

 

 

Web Title: Lok sabha elections 2019 mamta banerjee exit poll for bjp

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.