प्रचार करा आणि मिळवा 1 करोड रुपये, परेदश दौरा आणखी बरचं काही...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 12:56 PM2019-03-31T12:56:43+5:302019-03-31T12:58:10+5:30

तामिळनाडूमध्ये तर कार्यकर्त्यांना टीव्ही, फ्रीज, गाड्या अशा वस्तू मोफत देण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे.

Lok Sabha Elections 2019 - Rs 1 Crore To Foreign Trips How Tamil Nadu Party inducement to Its Cadre | प्रचार करा आणि मिळवा 1 करोड रुपये, परेदश दौरा आणखी बरचं काही...

प्रचार करा आणि मिळवा 1 करोड रुपये, परेदश दौरा आणखी बरचं काही...

Next

चेन्नई - देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी जोर पकडत असताना उमेदवारांकडून प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांसाठी विविध प्रलोभने दिली जात आहेत. निवडणुकीच्या काळात प्रचार करणारे कार्यकर्ते दिवसभर उन्हात राबून गल्लोगल्ली जाऊन उमेदवारांचा प्रचार करत असतात. पैसे, दारुच्या बाटल्या अशी प्रलोभने दाखवून कार्यकर्ते प्रचारासाठी आणले जातात. तामिळनाडूमध्ये तर कार्यकर्त्यांना टीव्ही, फ्रीज, गाड्या अशा वस्तू मोफत देण्याची अनेक वर्षांची परंपरा आहे. मात्र यावेळी एका नेत्याने आपण जिंकून यावं यासाठी कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करावं यासाठी कार्यकर्त्यांसाठी विशेष बक्षिस जाहीर केलं आहे. यामध्ये जो सर्वात चांगला प्रचार करेल त्याला सोन्याची चैन, फ्रीजसह मोफत परदेश दौरा करण्याचीही संधी देण्यात येणार असल्याचं आश्वासन कार्यकर्त्यांना दिलं आहे. 

प्रचारात कार्यकर्त्यांना प्रलोभनं दाखवण्याचा प्रकार माजी केंद्रीय मंत्री डीएमकेचे उमेदवार जगत रक्षकन यांनी सुरु केला. जगत रक्षकन यांनी आपण लढवत असलेल्या लोकसभा मतदारसंघात जे जे विधानसभा क्षेत्र येतात. यात सर्वात जास्त मते ज्या विधानसभा क्षेत्रातून येतील तेथील निवडणूक प्रभारीला 1 करोड रुपये देण्याची घोषणा केली आहे. एका लोकसभा मतदारसंघात 6 विधानसभा मतदारसंघ येतात. जगत रक्षकन यांच्या अनेक शैक्षणिक संस्था आहेत. तामिळनाडूतील 4 अब्जपती उमेदवारांपैकी ते एक उमेदवार आहे.

तर दुसरीकडे डीएमकेचे कोषाध्यक्ष यांनी घोषणा केली आहे की, वेल्लोर मतदारसंघातील ज्या विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक मते जो आणून देईल अशा प्रभारीला 50 लाख रुपये रोख बक्षिस देण्यात येईल. डीएमकेचे एस. दुरैमुरुगन यांचे चिरंजीव कातिर आनंद वेल्लोर येथून निवडणूक लढवत आहेत. दुरैमुरगन यांनी घोषणा करताना हे देखील सांगितले आहे की, जो कोणी 50 लाखाचे बक्षिस जिंकेल त्याने त्या पैशाचा वापर विधानसभा क्षेत्रातील पक्षाचे कार्यालय बांधण्यासाठी करावी अशी अट ठेवली आहे. 

तर या वेल्लोर लोकसभा मतदारसंघातील एआयडीएमकेचे उमेदवार ए.सी शनमुगम यांनी प्रचार करणाऱ्या कार्यकर्त्यांना बुलेट, घर आणि परदेश दौरा अशाप्रकारे बक्षिस जाहीर केले आहे. भाजपाच्या तिकीटावर 2014 साली ए. सी शनमुगम यांनी निवडणूक लढवली होती मात्र तेव्हा ते निवडणूक हरले होते.  
 

Web Title: Lok Sabha Elections 2019 - Rs 1 Crore To Foreign Trips How Tamil Nadu Party inducement to Its Cadre

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.