लोकसभा निवडणूक 2019: मतदानादरम्यान समाज कंटकांनी EVM फोडलं, मतदान प्रक्रिया खंडित
By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2019 10:14 AM2019-05-06T10:14:59+5:302019-05-06T10:27:05+5:30
देशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच बिहारमध्ये मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं आहे.
पाटणाः देशात पाचव्या टप्प्यातील मतदान सुरू असतानाच बिहारमध्ये मतदान प्रक्रियेला गालबोट लागलं आहे. बिहारमध्ये पाचव्या टप्प्यातील मतदानादरम्यान ईव्हीएम फोडण्याची घटना समोर आली आहे. सारण लोकसभा मतदारसंघात हा प्रकार घडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सारण लोकसभा निवडणुकींतर्गत सोनपूर विधानसभेच्या नयागावातील 131 नंबर मतदान केंद्रावर ही ईव्हीएम मशिन फोडल्यानं एकच गोंधळ उडाला आहे. त्यामुळे मतदान प्रक्रिया काही वेळासाठी खंडित करण्यात आली होती. या प्रकरणी रणजित पासवान याला अटक करण्यात आली आहे.
या प्रकरणाची माहिती स्थानिक पोलिसांना देण्यात आली आहे. या प्रकारानंतर नयागावातील मतदान केंद्र संख्या 131वरची मतदान प्रक्रिया खंडित करण्यात आली आहे. सारणच्या जागेवरून एनडीएचा सरळ सरळ महागठबंधनशी मुकाबला आहे. या जागेवरून लालूंचे नातेवाईक चंद्रिका राय महागठबंधनचे उमेदवार आहेत. तर एनडीएकडून राजीव प्रताप रुडी रिंगणात आहेत. बिहारमधल्या पाच लोकसभेच्या जागांसाठी आज मतदान होत आहेत.
सीतामढी, मधुबनी, मुजफ्फरपूर, सारण आणि हाजीपूर(सु) हे मतदारसंघ 82 उमेदवारांच्या भविष्याचा फैसला करणार आहेत. या पाचव्या टप्प्यात सारणमधून भाजपाचे राजीव प्रताप रुडी आणि आरजेडीचे चंद्रिका राय, हाजीपूरमधले आरजेडीचे शिवचंद्र राम, एलजेपीचे पशुपती कुमार पारस, मधुबनीच्या व्हीआयपीचे बद्री पूर्वे, अपक्ष शकील अहमद, मुजफ्फरपूरमधले बीएसपीच्या स्वर्णलता देवी आणि भाजपाच्या अजय निषाद, सीतामढीतले जेडीयूचे सुनील कुमार पिंटू, आरजेडीचे अर्जुन राय यांच्यासह प्रमुख उमेदवार रिंगणात आहेत.
Bihar: One Ranjit Paswan arrested on charges of vandalizing an EVM machine at polling booth number 131 in Chhapra. #LokSabhaElections2019pic.twitter.com/0mqrXc4mjT
— ANI (@ANI) May 6, 2019