Akhilesh Yadav : "कोरोना लसीवरून वाद, लोकांना येतोय हार्ट अटॅक"; अखिलेश यादव यांचं भाजपावर टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2024 10:52 AM2024-05-01T10:52:27+5:302024-05-01T11:30:21+5:30
Akhilesh Yadav And Corona Vaccine : समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही यावरून जोरदार निशाणा साधत भाजपाच्या लोकांनी आज ज्या पद्धतीने प्रचार केला आणि लोकांना लसीकरण करा, असं सांगितलं, तोही घोटाळा निघाला. जनता मतदानाने या खोट्याचा हिशोब करेल, असं म्हटलं आहे.
कोरोना लसीबाबतचा वाद आणखी वाढला आहे. याबाबत विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारवर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. तसेच समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनीही यावरून जोरदार निशाणा साधत भाजपाच्या लोकांनी आज ज्या पद्धतीने प्रचार केला आणि लोकांना लसीकरण करा, असं सांगितलं, तोही घोटाळा निघाला. जनता मतदानाने या खोट्याचा हिशोब करेल, असं म्हटलं आहे.
लसीबाबत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवर अखिलेश यादव म्हणाले की, कोरोना लसीबाबत ज्या प्रकारे वाद सुरू झाला आहे त्यामुळे लोकांना हार्ट अटॅक येत आहे आणि जगातील सर्वात शक्तिशाली न्यायालयाने या लसीबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे. या भाजपावाल्यांनी सर्वांना एकाच प्रकारची लस दिली. जर दोन डोस दिले गेलेत तर 80 कोटी लोकांना ते दिले गेले.
"बीजेपी वालों ने जिस तरह लोगों से प्रचार करके कहा कि लगाइए वैक्सीन, आज तो वो भी जुमला निकला। बीजेपी वालों को वोट ना देकर जनता जिस तरह से झूठ बोला गया था उसका हिसाब किताब लेगी।"
— Samajwadi Party (@samajwadiparty) April 30, 2024
- माननीय राष्ट्रीय अध्यक्ष श्री अखिलेश यादव जी, सैफई pic.twitter.com/W79phxzJSH
भाजपावर निशाणा साधत, सपा अध्यक्ष म्हणाले की, "भाजपाच्या लोकांनी ज्या प्रकारे प्रचार केला आणि लोकांना लसीचे बूस्टर डोस घेण्यास सांगितले... आज तोही घोटाळा ठरला. न्यायालयाचा निर्णय आणि माहिती समोर येत आहे, काही जण ही देखील माहिती देत आहेत की जेव्हा भारताची कोरोनाची लस तयार झाली तेव्हा ज्या लोकांनी अप्रूव्हल दिलं त्या लोकांनी देखील लस घेतली नाही आणि सर्वसामान्य लोकांना लस देण्यात आली आहे."
अखिलेश यांनी आता लसीचं उत्तर हे मतदान करून देण्यास सांगितलं आहे. ते म्हणाले, "आता भाजपाला मतदान न करता, त्यांनी जनतेला जे खोटं सांगितलं त्याचा हिशोब करा." फक्त अखिलेश यादवच नाही तर सर्व विरोधी पक्षांचे नेतेही लसीबाबत सरकारवर निशाणा साधत आहेत. सपा नेते राम गोपाल यादव म्हणाले की, यूके कोर्टात जवळपास 51 खटले दाखल करण्यात आले आहेत. कोरोना लसीमुळे ब्रेन स्ट्रोक आणि हार्ट अटॅक यांसारखे आजार होत आहेत. त्याचे दुष्परिणाम भारतातही समोर आले आहेत.